-
उन्हाळा ऋतू आहे त्यामुळे घशाला सतत कोरड पडते, घामाने पूर्ण अंग भिजून जाते. त्यामुळे कंटाळल्याने अनेकांचा आहारही कमी होतो आणि सतत काहीतरी थंड प्यावेसे वाटते. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
उन्हाळ्यात स्वयंपाकघरात उभं राहून जेवण बनवणे देखील असह्य होते. त्यामुळे अनेक जण फक्त रात्रीसाठी एकच खिचडी किंवा पुलाव बनवतात. म्हणजे स्वयंपाकघरात जास्त वेळ उभं राहण्याची गरज भासणार नाही. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
दिवसभर ऑफिसमध्ये काम करून आलेला महिला वर्ग देखील दमून जातो आणि मग त्यांच्यात कोणतीच ताकद उरत नाही. तर अशावेळी तुम्ही पुढीलप्रमाणे काही हलके आणि पौष्टीक पदार्थ बनवू शकता. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
दहीभात – उन्हाळ्यात पोटाला थंडावा देण्यासाठी दुपारचा उरलेला भात, दही आणि काकडी, टोमॅटो आणि कांदे यांसारख्या भाज्या, मोहरी, कढीपत्तासह दहीभात बनवा. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
दूधपोळी – हा एक आरोग्यदायी आणि प्रथिनयुक्त पदार्थ आहे. दुपारच्या उरलेल्या पोळ्या कुसकरून दुधात घाला आणि मस्त खा. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
मूग डाळीची कोशिंबीर – कोशिंबीर बनवण्यासाठी भिजवलेली मुगाची डाळ, काकडी, टोमॅटो मिसळून आणि मोहरी, वाळलेल्या लाल मिरच्या आणि कढीपत्तासह तुम्ही ही पौष्टीक कोशिंबीर बनवू शकता. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
कच्चा आंब्याची कोशिंबीर – तिखट आणि चविष्ट कोशिंबीर बनवण्यासाठी तुम्हाला कैरीचे छोटे तुकडे , काकडी, गाजर, बीट, लिंबाचा रस, मीठ, मिरपूड, मध, कोथिंबीर आदींची गरज लागेल. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
पराठा रोल – दुपारी उरलेल्या पोळ्यांवर तुम्हाला फक्त केचप आणि हिरव्या चटणीचा थर लावायचा आहे आणि गाजर, बीट, सिमला मिरची आणि काकडी आदी बारीक कापलेल्या भाज्या त्याच्यावर ठेवा आणि पोळीचा घट्ट रोल करा. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
पनीर सँडविच – मेयॉनीज, बारीक कापून घेतलेली हिरवी मिरची, बारीक तुकडे करून घेतलेली सिमला मिरची, पनीर, काळी मिरी, मीठ घालून सर्व मिश्रण एकजीव करून घ्या व मिश्रण ब्रेड स्लाईजला लावून घ्या.त्यानंतर जर तुमच्याकडे ओव्हन असेल तर ओव्हनमध्ये किंवा तव्यावर हे सर्व ब्रेड ठेवा आणि झाकण ठेवा. (फोटो सौजन्य: @Freepik )
उन्हाळ्यात रात्रीच्या जेवणासाठी काय बनवायचं असा प्रश्न पडतो? ‘हे’ सोपे पदार्थ बनवून पाहा
उन्हाळ्यात स्वयंपाकघरात उभं राहून नाश्ता, जेवण करायचा कंटाळा येत असेल तर पुढीलप्रमाणे काही सहज-सोपे पदार्थ बनवून पाहा…
Web Title: Beat the heat no cook dinner foods this five healthy dinner dishes for summer nights must try asp