• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • क्विझ – दीपिका पादुकोण
  • इस्रायल इराण संघर्ष
  • Sudoku
  • Stock Market
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • क्विझ – दीपिका पादुकोण
  • इस्रायल इराण संघर्ष
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. do you know benefits of eating eggs in summer ndj

उन्हाळ्यात अंडी खाण्याचे फायदे माहितेय का? जाणून घ्या

उन्हाळ्यात अंडी खाणे कितपत चांगले आहे, याविषयी द इंडियन एक्स्प्रेसनी तज्ज्ञांच्या हवाल्याने सविस्तर माहिती सांगितली आहे.

May 27, 2024 11:08 IST
Follow Us
  • benefits of eating eggs in summer
    1/9

    सध्या उन्हाळा सुरू आहे. दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढत आहे. अशात उन्हापासून संरक्षण करताना आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. उन्हाळ्यात थंड पदार्थ किंवा पेयांचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. अशात उन्हाळ्यात काय खावे आणि काय खाऊ नये, हे सुद्धा समजून घेणे गरजेचे आहे. (Photo : Freepik)

  • 2/9

    तुम्ही उन्हाळ्यात अंडी खाता का? उन्हाळ्यात अंडी खाणे कितपत चांगले आहे, याविषयी द इंडियन एक्स्प्रेसनी तज्ज्ञांच्या हवाल्याने सविस्तर माहिती सांगितली आहे. (Photo : Freepik)

  • 3/9

    जगभरात अंडी हा आहारातील एक महत्त्वाचा भाग मानला जातो. अंड्यामध्ये असलेल्या पौष्टिक घटकांमुळे हा एक चांगला पर्याय मानला जातो. अंड्यामध्ये प्रोटिन्स, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असतात, जे शरीराच्या आरोग्यासाठी चांगले असतात, पण काही लोकांचा असा विश्वास आहे की, अंडी खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते आणि पोटाचा त्रास होतो. (Photo : Freepik)

  • 4/9

    न्यूट्रिशनिस्ट अमिता गद्रे सांगतात की, आपण उन्हाळ्यात अंडी खाऊ शकतो. त्यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे आणि या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “कोणत्याही इन्फ्लूअन्सरचे न ऐकता तुम्हाला काय वाटते ते समजून घ्या. उन्हाळ्यात आहाराबाबत सर्वात मोठी चूक तुम्ही करता ती म्हणजे पुरेसे पाणी न पिणे आणि फायबरयुक्त पदार्थ न खाणे.” (Photo : Freepik)

  • 5/9

    आहारतज्ज्ञ सल्लागार कनिका मल्होत्रा सांगतात, “अंडी हा पोषक तत्वांनी भरलेला पदार्थ आहे, त्याचे असंख्य असे फायदे उन्हाळ्यातसुद्धा दिसून येतात.”मल्होत्रा यांनी आहारात अंड्याचा समावेश करण्याची अनेक कारणे सांगितली आहेत. जाणून घेऊ या, आहारात अंड्याचा समावेश का करावा? (Photo : Freepik)

  • 6/9

    अनेक लोकांचा गैरसमज असतो की अंडी शरीरात उष्णता निर्माण करतात. उलट त्यात सोडियम, पोटॅशियम आणि फॉस्फरससारख्या इलेक्ट्रोलाइट्सचे चांगले स्त्रोत आहेत, जे शरीरात पाण्याची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. (Photo : Freepik)

  • 7/9

    उन्हाळ्यात अति उष्णतेमुळे थकवा येतो. अंडी हा प्रोटीनचा चांगला स्त्रोत आहे, ज्यामध्ये आवश्यक अमिनो ॲसिड असतात. हे प्रोटीन शरीरातील नवीन पेशी निर्माण करण्यास मदत करतात, ज्यामुळे आपल्याला दिवसभर ऊर्जा मिळते. (Photo : Freepik)

  • 8/9

    अंड्यामध्ये आवश्यक व्हिटॅमिन्स, मिनरल्स, जसे की व्हिटॅमिन ए, डी, बी१२ आणि लोहाचे प्रमाण असतात. हे पोषक घटक रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यास मदत करतात, ज्यामुळे उन्हाळ्यात आपण लहान मोठ्या आजारांचा सामना करण्यास सक्षम असतो. (Photo : Freepik)

  • 9/9

    अंड्यामध्ये अँटिऑक्सिडंट्स जसे की लुटेन, झेक्साअँथेन ( lutein and zeaxanthin) असतात, जे सूर्यप्रकाशापासून डोळ्यांचे संरक्षण करण्यास मदत करतात. हे अँटिऑक्सिडंट्स वयाशी संबंधित असलेले मॅक्युलर डिजेनेरेशन टाळण्याससुद्धा मदत करू शकतात. (Photo : Freepik)

TOPICS
लाइफस्टाइल
Lifestyle
लाइफस्टाइल न्यूज
Lifestyle News
हेल्थ न्यूज
Health News
हेल्दी लाइफस्टाइल
Healthy Lifestyle

Web Title: Do you know benefits of eating eggs in summer ndj

IndianExpress
  • US strikes didn’t destroy Iran nuclear sites, only set back programme by months: Pentagon report
  • After the fragile truce: What now for Trump, Netanyahu, and Ayatollah Khamenei?
  • Kashmiri man accused of stealing paraded shirtless with hands tied on Jammu police vehicle
  • IND vs ENG: How the game ebbed and flowed towards an England stroll
  • After delays, Axiom-4 with India’s Shukla set for launch today
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.

  • होम
  • ई-पेपर
  • फोटो
  • व्हिडिओ
  • करिअर
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • रेसिपी
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • बुलढाणा
    • वाशिम
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • देश-विदेश
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • राशिभविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • क्विझ
  • चतुरा
  • लाइफस्टाइल
  • ऑटो
  • विश्लेषण
  • तंत्रज्ञान
  • FYI
  • वेब स्टोरीज
  • ऑडिओ
  • करिअर
    • चतुरंग
    • लोकरंग
    • बालमैफल
    • व्हिवा
    • वास्तुरंग
    • विशेष
  • अन्य
    • नवनीत
  • ब्लॉग्स
  • आमच्या विषयी
  • Contact Us
  • TERMS AND CONDITIONS
  • RSS
  • Privacy Policy
  • About Us