-
उन्हाळा म्हटलं की, बऱ्याच जणांना डिहायड्रेशनच्या समस्येला बहुतेकदा सामोरं जावं लागते. शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्यानं शरीरावर गंभीर परिणाम उदभवू शकतात. (फोटो: Freepik)
-
उन्हाळ्यात घामाद्वारे शरीरातील पाणी, क्षार व मिनरल्स शरीराबाहेर फेकले जातात; ज्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी सतत कमी-जास्त होत असते. शरीरातील पाण्याची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी उन्हाळ्याच्या दिवसांत मुबलक पाणी पिणं आवश्यक असतं.(फोटो: Freepik)
-
या लेखात, आपलं शरीर किती लवकर डिहायड्रेट होऊ शकते, उन्हाळ्यात कुणी जास्त काळजी घेतली पाहिजे आणि स्वतःला थंड, हायड्रेटेड आणि निरोगी ठेवण्यासाठी काय केलं पाहिजे हे समजून घेणार आहोत.(फोटो: Freepik)
-
उन्हाळ्यात मेहनतीचं काम किंवा व्यायाम केल्यानं तुमच्या शरीरातील पाणी ३० मिनिटांत कमी होऊ शकतं. अशा वेळी घरातही सुरक्षिततेची हमी मिळत नाही.उष्ण, दमट वातावरण विशिष्ट औषधांसह एकत्रित केल्यानं तुम्हाला असलेला डिहायड्रेशनचा धोका लक्षणीयरीत्या वाढू शकतो.(फोटो: Freepik)
-
मुलं, वृद्ध आणि उन्हात काम करणारे किंवा उष्ण, दमट वातावरणात राहणारे लोक विशेषतः डिहायड्रेशनला बळी पडतात. सुरक्षित राहण्याची गुरुकिल्ली म्हणजे तहान लागण्यापूर्वीच हायड्रेशनला प्राधान्य देणं.(फोटो: Freepik)
-
या उन्हाळ्यात डिहायड्रेशनचा सामना करण्यासाठी आणि थंड राहण्यासाठी डॉ. नसिरुद्दीन यांनी काही टिप्स दिल्या आहेत.(फोटो: Freepik)
-
नियमितपणे पाणी प्या : दररोज सहा ते आठ ग्लास पाणी पिण्याचे लक्ष्य ठेवा. किंवा पाण्यात मीठ आणि साखर मिसळून साधे पाणी प्या. तहान लागेपर्यंत थांबू नका.(फोटो: Freepik)
-
तुमच्या लघवीच्या रंगाचं निरीक्षण करा. स्वच्छ किंवा हलका पिवळा रंग चांगलं हायड्रेशन दर्शवितो; तर गडद पिवळा रंग डिहायड्रेशन दर्शवितो.(फोटो: Freepik)
-
गडद लघवी, मळमळ किंवा चक्कर येणं यांसारखी चिन्हं डिहायड्रेशन दर्शवितात. थंड, हवेशीर जागा शोधा. सतत पाणी प्या आणि लक्षणं कायम राहिल्यास वैद्यकीय सल्ला जरूर घ्या.(फोटो: Freepik)
डिहायड्रेशन म्हणजे काय? त्याची लक्षणं काय? डॉक्टरांनी सांगितला उपाय
Dehydration Symptoms in summer : या लेखात, आपलं शरीर किती लवकर डिहायड्रेट होऊ शकते, उन्हाळ्यात कुणी जास्त काळजी घेतली पाहिजे आणि स्वतःला थंड, हायड्रेटेड आणि निरोगी ठेवण्यासाठी काय केलं पाहिजे हे समजून घेणार आहोत.
Web Title: This is how quickly a human body gets dehydrated in summer easy ways to stay healthy in summer srk