-
डाळ ही अत्यंत पौष्टिक असून, याचे आरोग्यास अनेक फायदे आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त डाळीचा आहारात समावेश करणे गरजेचे आहे. डाळीचे अनेक प्रकार आहेत; पण विशेष म्हणजे तूरडाळ शाकाहारी लोकांसाठी एक उत्तम पर्याय आहे; पण जर हीच डाळ एक महिन्यासाठी आहारातून काढून टाकली, तर काय होईल? (Photo : Freepik)
-
हैदराबाद येथील यशोदा हॉस्पिटल्सचे वरिष्ठ सल्लागार फिजिशियन व मधुमेह तज्ज्ञ डॉ. के सोमनाथ गुप्ता सांगतात, “आपल्या चांगल्या निरोगी आरोग्यासाठी प्रोटीन्सची अत्यंत आवश्यकता असते; पण आहारात एक महिना डाळ नसेल, तर प्रोटीन्स मिळवण्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागू शकतो. विशेषत: शाकाहारी लोकांसाठी हे खूप मोठे आव्हान ठरू शकते.” (Photo : Freepik)
-
एक महिना डाळ न खाल्ल्याने आपल्या शरीरावर कोणते परिणाम होऊ शकतात, हे समजून घेण्यासाठी डाळ आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. (Photo : Freepik)
-
स्नायू मजबूत ठेवण्यासाठी डाळ ही अत्यंत महत्त्वाची असून, शाकाहारी लोकांसाठी ती अत्यंत फायदेशीर आहे.डाळीमध्ये खूप जास्त प्रमाणात फायबर असते, जे पचनास मदत करते. त्याशिवाय यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो आणि आतड्यांचे आरोग्य सुदृढ राहते. (Photo : Freepik)
-
डाळींमध्ये लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियम व जीवनसत्त्वे असतात; जी डाळीला अधिक पौष्टिक बनविण्यास मदत करतात. (Photo : Freepik)
-
नियमित डाळीचे सेवन केल्याने शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते; ज्यामुळे हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो. (Photo : Freepik)
-
डाळीमध्ये असलेले कॉम्प्लेक्स कर्बोदके पचायला वेळ घेतात. त्यामुळे रक्तातील साखर वाढत नाही.(Photo : Freepik)
-
डाळीमध्ये प्रोटन्स आणि फायबर भरपूर प्रमाणात राहतात; ज्यामुळे वजन कमी करण्यास आणि नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.(Photo : pexels)
-
डाळीमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस असतात; जे हाडे मजबूत ठेवण्यास मदत करतात. (Photo : Freepik)
वरणामुळे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी होते? वाचा, डाळीचे अनेक फायदे
शरीरावर कोणते परिणाम होऊ शकतात, हे समजून घेण्यासाठी डाळ आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
Web Title: Benefits of eating dal in diet healthy food for healthy lifestyle ndj