-
उन्हाळ्याचा हंगाम सुरू आहे. या ऋतूत उन्हामुळे आणि मातीमुळे त्वचेचे खूप नुकसान होते. त्वचेवर मुरुम, पिंपल्स वगैरे होऊ लागतात. इतकंच नाही तर यामुळे त्वचाही निस्तेज दिसते, उन्हाळ्याच्या ऋतूत चेहऱ्याची विशेष काळजी घेणं गरजेचं असतं. (Photo: Freepik)
-
त्यामुळे उन्हाळ्यात त्वचा निरोगी आणि सुंदर होण्यासाठी त्वचेची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी हे आम्ही तुम्हाला इथे सांगतो.(Photo: Freepik)
-
सूर्याच्या किरणांमुळे त्वचेचे नुकसान होऊ शकते. सूर्याच्या किरणांमुळे त्वचेचे वय अकाली होऊ शकते. सूर्याची हानिकारक किरणे टाळण्यासाठी उन्हाळ्यात सनस्क्रीन लावायलाच हवी.(Photo: Freepik)
-
उन्हाळ्यात त्वचा हायड्रेट ठेवणे खूप महत्वाचे आहे. कारण आपल्या शरीरातून घाम बाहेर पडतो, ज्यामुळे त्वचा डिहायड्रेट होते. (Photo: Freepik)
-
तुळशीपासून बनवलेले टोनर तुम्ही नियमित वापरल्याने चेहऱ्यावरील मुरुमांची आणि डागांची समस्या दूर होईल. (Photo: Freepik)
-
एलोवेरा आपल्या त्वचेसाठी फार महत्वाचा आहे. एलोवेरामुळे त्वचा हायड्रेट राहण्यास मदत होते. स्किनच्या समस्या टाळण्यासाठी क्रिम किंवा पावडरचा वापर करा.(Photo: Freepik)
-
चेहऱ्याला सनस्क्रीन लाववल्याने उन्हापासून बचाव होतो याशिवाय त्वचा ग्लोईंग आणि मॉईश्चराईज दिसते.(Photo: Freepik)
-
उन्हाळ्यात त्वचेला हायड्रेट करण्यात आणि मॉइश्चराइझ करण्यात अजिबात निष्काळजी होऊ नका. त्यामुळे त्वचा सॉफ्ट आणि प्लम्पी दिसते.(Photo: Freepik)
-
नेहमी आंघोळीनंतर लगेच मॉइश्चरायझर लावा. जेणेकरून ते त्वचेवर जमा झालेले पाणी शोषून फक्त हायड्रेटच नाही तर त्वचेला मॉइश्चरायझ देखील करते.(Photo: Freepik)
Skin Care: उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्याल? ‘या’ टीप्स फॉलो करा
Skincare: उन्हाळ्यात त्वचा निरोगी आणि सुंदर होण्यासाठी त्वचेची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी हे आम्ही तुम्हाला इथे सांगणार आहोत.
Web Title: Best skincare essentials for summer 2024 achieve radiant healthy skin all season long srk