-
आपण आजारी पडलो की, सगळ्यात आधी डॉक्टरांकडे जातो. डॉक्टर गोळ्या किंवा द्रव स्वरूपातील औषधे आपल्याला लिहून देतात. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
आपल्यातील बऱ्याच जणांना गोळ्या घेण्याचा कंटाळा येतो. म्हणूनच आपण डॉक्टरांना कफ सिरप किंवा द्रव औषधे देण्याची शिफारस करतो. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
गोळ्यांच्या तुलनेत द्रव स्वरूपातील औषधे अनेकांसाठी सोईस्कर ठरतात.औषधे घेताना बाटलीबरोबर येणारा मापाचा कप यामुळे तोंडावाटे औषध पोटात जाऊन, जलद कार्य करण्यास सुरुवात करते.(फोटो सौजन्य: @Freepik )
-
पण, अनेकदा द्रवरूप औषधे किंवा बाटलीमधील पातळ औषधाचे सेवन केल्यानंतर पाणी पिऊ नये, असा सल्ला आपल्याला दिला जातो. तर द्रवरूप औषधांच्या सेवनानंतर पाणी प्यावे की नाही याबद्दल सविस्तर जाणून घेऊ. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
याविषयी दी इंडियन एक्स्प्रेसने मुंबई येथील स्वाहिता आयुर्वेद क्लिनिकच्या संस्थापक डॉक्टर मनीषा मिश्रा गोस्वामी, पुणे येथील सह्याद्री हॉस्पिटलच्या आहारतज्ज्ञ डॉक्टर शुची शर्मा व नोएडाच्या न्यूबर्ग डायग्नोस्टिक लॅबच्या प्रमुख डॉक्टर विज्ञान मिश्रा यांच्याशी चर्चा केली. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
सुका खोकला आणि ओला खोकला या आरोग्य समस्यांवर कफ सिरपमधील मेन्थॉल तात्पुरता आराम देते. पण, हे सिरप थेट घशावर काम करीत नाही, तर त्याऐवजी ते श्वसनसंस्थेवर कार्य करते. तर स्वीट लोझेंज दीर्घकाळ चघळल्यास लगेच आराम देतात. सिरप एकदा पचल्यानंतर पाण्याचे सेवन त्यांच्या परिणामकारकतेवर कोणताही परिणाम करत नाही. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
द्रवरूप औषधे किंवा कफ सिरपनंतर पाणी पिणे सामान्यतः सुरक्षित असते. कारण- ते फुप्फुसातील श्लेष्मा किंवा कफ काढून टाकण्यास मदत करते. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
पण, डॉक्टरांचे असेही म्हणणे आहे की, कफ सिरप किंवा द्रवरूप औषधे घेतल्यानंतर लगेचच पाणी पिऊ नये. कारण- या औषधांमध्ये अनेकदा घशावर कंट्रोल, चिडचिड शांत करणे व सक्रिय घटकांची प्रभावीता वाढविणाऱ्या घटकांचा समावेश असतो.(फोटो सौजन्य: @Freepik )
-
कोणतेही द्रवरूप औषध प्यायल्यानंतर किमान १५ मिनिटे ते अर्धा तास प्रतीक्षा करण्याची शिफारस केली आहे. काही मिनिटांच्या प्रतीक्षेमुळे औषध पूर्णपणे शोषले जाण्यास मदत होते. (फोटो सौजन्य: @Freepik )
लिक्विड औषधाचे सेवन केल्यानंतर किती वेळाने पाणी प्यावे? तज्ज्ञांनी सांगितलेले हे फायदे, तोटे समजून घ्या
द्रवरूप औषधांच्या सेवनानंतर पाणी प्यावे की नाही याबद्दल जाणून घेऊ…
Web Title: Should you drink water after taking cough syrup waiting at least fifteen minutes to half an hour before drinking any liquids asp