-
Aluminium Foil Paper or butter paper: चपाती, पराठे उबदार ठेवण्यासाठी ॲल्युमिनियम फॉईलचा वापर केला जातो. त्याचबरोबर घरातून मुलांना किंवा ऑफिसला जाताना डबा देताना या ॲल्युमिनियम फॉइलचा वापर केला जातो. (फोटो : Freepik)
-
पण, तुम्हाला माहीत आहे का की हे ॲल्युमिनियम फॉइल तुमच्या आरोग्याला हानी पोहोचवू शकते. अन्न पॅकिंग पेपरमध्ये पॅक करणे आरोग्यासाठी चांगले आहे का? जाणून घ्या.(फोटो : Freepik)
-
खरं तर, ॲल्युमिनियम फॉइल अन्न पॅक करण्यासाठी चांगले आहे. परंतु, अलीकडेच याबद्दल एक संशोधन समोर आले आहे, ज्याने लोक आश्चर्यचकित झाले आहेत.(फोटो : Freepik)
-
ॲल्युमिनियम फॉइल आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे. हे अन्न कणांचे ऑक्सिडायझेशन करते, ज्यामुळे अनेक आजारही होऊ शकतात. (फोटो : Freepik)
-
आता प्रश्न पडतो की दोघांपैकी कोणते चांगले? ॲल्युमिनियम फॉइल की बटर पेपर? चला जाणून घेऊयात.(फोटो : Freepik)
-
ॲल्युमिनियम फॉइल अन्न पॅक करण्यासाठी हानिकारक आहे. जेव्हा आपण गरम अन्न ॲल्युमिनियम फॉइलमध्ये पॅक करतो तेव्हा आजारांची भीती वाढते, त्यामुळे मेंदू आणि हाडांचे खूप नुकसान होते.(फोटो : Freepik)
-
बटर पेपरला रॅपिंग पेपर किंवा सँडविच पेपर म्हणून ओळखले जाते. हे ॲल्युमिनियम फॉइलपेक्षा चांगले आहे. (फोटो : Freepik)
-
बटर पेपर हा नॉन-स्टिक पेपरसारखा असतो, त्यात कागद असतो. हॉटेल्स आणि मिठाईच्या दुकानात याचा वापर केला जातो. हे अन्नातील अतिरिक्त तेलदेखील शोषून घेते, त्यामुळे ते आरोग्यासाठी चांगले मानले जाते. (फोटो : Freepik)
-
जर तुम्हाला खारट, मसालेदार आणि व्हिटॅमिन सी फूड पॅक करायचे असेल तर त्यासाठी बटर पेपर हा उत्तम पर्याय आहे. (फोटो : Freepik)
चपाती-भाकरी ॲल्युमिनिअम फॉइलमध्ये गुंडाळून ऑफिसला नेता? जाणून घ्या गंभीर परिणाम
Aluminium Foil Side Effects: प्रवासात किंवा ऑफिसमध्ये अन्न पॅक करण्यासाठी आपण अनेकदा ॲल्युमिनियम फॉइल किंवा बटर पेपर वापरतो. पण, याचा आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतो याचा कधी विचार केला आहे का? आपण अनेकदा विचार करतो की, त्यात अन्न गुंडाळल्याने अन्न गरम राहते, परंतु अन्न पॅकिंग पेपरमध्ये पॅक करणे आरोग्यासाठी चांगले आहे का? जाणून घ्या.
Web Title: Aluminium foil paper or butter paper what is more harmful chapatis wrap in butter paper or aluminum foil paper srk