-
सकाळचा नाश्ता हा दिवसातील सर्वात महत्त्वाचा आहार मानला जातो. परंतु, काही लोकं सकाळी घाईने किंवा नकळत अशा गोष्टी खातात जे रिकाम्या पोटी खाल्ल्याने आरोग्यावरही काही गंभीर परिणाम होऊ शकतात. जाणून घेऊया अशा काही पदार्थांबद्दल.
-
मोसंबी, लिंबू आणि संत्री यांसारख्या फळांमध्ये व्हिटॅमिन सी आणि सायट्रिक ऍसिड मुबलक प्रमाण असते. रिकाम्या पोटी या फळांचे सेवन केल्याने पोटात जळजळ, ऍसिडिटी आणि अपचन होऊ शकते. -
दह्यामध्ये लॅक्टिक ऍसिड असते, जे पोटातील ऍसिडिटीची पातळी असंतुलित करते. रिकाम्या पोटी याचे सेवन केल्याने पोटातील चांगले बॅक्टेरिया नष्ट होऊ शकतात, ज्यामुळे ॲसिडिटी वाढू शकते आणि पोटदुखी आणि डायरियाच्या समस्या होऊ शकतात. -
ताजे फळांचे रस असो किंवा पॅक केलेला फळांचा रस. जर तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी फळांचे रसाचे सेवन केले तर त्याचा तुमच्या यकृतावर वाईट परिणाम होऊ शकतात. तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल तर रिकाम्या पोटी रसाचे सेवन केल्याने तुमच्या शरीरातील साखरेची पातळी वाढू शकते.
-
सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी आइस्क्रीम, थंड पाणी इत्यादी थंड गोष्टींचे सेवन केल्यास तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. यामुळे तुमची पचनक्रिया मंदावते आणि तुम्हाला पोटदुखीचा समस्या होऊ शकतात.
-
तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी मसालेदार आणि तळलेले अन्न खाणे देखील टाळावे, कारण यामुळे तुम्हाला पोटदुखीचा त्रास होऊ शकतो. यामुळे तुम्हाला अपचन आणि ॲसिडिटी सारख्या पचनाच्या समस्या होऊ शकतात. -
जर तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफी प्यायली तर त्यामुळे शरीरात आम्लता आणखी वाढू शकते. यामुळे गॅस आणि ब्लोटिंग यासारख्या समस्या होऊ शकतात.
( सर्व फोटो : पेक्सेल्स)
रिकाम्या पोटी ‘या’ पदार्थांचे सेवन ठरू शकते आरोग्यासाठी धोकादायक; जाणून घ्या होणाऱ्या गंभीर परिणामांबद्दल…
सकाळी रिकाम्या पोटी काही पदार्थांचे सेवन करणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते जाणून घेऊया या पदार्थांबद्दल.
Web Title: Do not consume these foods on an empty stomach will be hazardous to health know about serious health consequences arg 02