-
पावसाळ्यात आरोग्याची काळजी घेणे, खूप गरजेचे आहे. योग्य काळजी घेऊन तुम्ही तुमच्या कुटुंबाला आणि स्वत:ला आजारांपासून वाचवू शकता. (Photo : Freepik)
-
UNDAC आणि जिनिव्हा येथील सार्वजनिक आरोग्यप्रमुख डॉ. सबिन कापासी यांनी पावसाळी आजारांपासून स्वत:ला कसे वाचवायचे, यासाठी काही खास टिप्स दिल्या आहेत. चला तर जाणून घेऊ या. (Photo : Freepik)
-
नळाचे पाणी वापरू नका –
पावसाळ्यात सर्वात जास्त आजार हे नळाच्या पाण्यापासून होतात. नळाचे पाणी पिणे टाळा. याशिवाय दात घासण्यासाठी आणि भांडी धुण्यासाठी शुद्ध पाणी किंवा उकळलेले पाणी वापरा. जेवणापूर्वी किंवा टॉयलेटवरून आल्यानंतर साबण आणि स्वच्छ पाण्याने हात धूवा. (Photo : Freepik) -
भाजीपाला आणि फळे धूवा –
पावसाळ्यात आहार घेतानाही विशेष काळजी घ्यावी. मार्केटमधून आणलेला भाजीपाला किंवा फळे स्वच्छ धुऊन घ्या. त्यानंतरच खा. (Photo : Freepik) -
परिसर स्वच्छ ठेवा –
पावसाळ्यात आपल्या आजूबाजूला स्वच्छता ठेवणे, खूप जास्त गरजेचे आहे. नियमित तुमचा परिसर स्वच्छ ठेवा आणि पावसाळ्यात कुठेही पाणी साचलेले असेल तर लगेच स्वच्छ करा, कारण साचलेल्या पाण्यामध्ये डास असू शकतात, ज्यामुळे पावसाळ्यात आजारांचे प्रमाण वाढते. (Photo : Freepik) -
पूरग्रस्त भागात जाणे टाळा –
पावसाळ्यात अनेकदा पूरग्रस्तस्थिती निर्माण होते. रस्त्यावर साचलेले पाणी, नदी नाल्यांवर पूर येतो. अशा वेळी पूरग्रस्त भागातून जाऊ नका. पुराचे पाणी हे खूप दूषित असते, ज्यामुळे आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. (Photo : Freepik) -
मॉस्किटो रिपेलेंट्स (mosquito repellents) वापरा-
पावसाळ्यात डासांपासून स्वत:ला वाचविण्याचा अनेक जण प्रयत्न करतात. अशा वेळी मॉस्किटो रिपेलेंट्सचा वापर करा. त्वचेवर मॉस्किटो रिपेलेंट्स लावल्याने डासांपासून तुम्ही सुरक्षित राहू शकता. याशिवाय झोपताना डासांपासून दूर राहण्यासाठी मच्छरदाणीचा वापर करा. (Photo : Freepik) -
लक्षणांपासून सावध राहा –
पाण्यापासून होणाऱ्या आजारांच्या लक्षणांपासून सावध राहा. जर तुम्हाला पावसाळ्यात डायरिया, उलटी, ओटीपोटात दुखणे, ताप किंवा इत्यादी आसामान्य लक्षणे जाणवत असतील तर त्वरित डॉक्टरांकडे जा. (Photo : Freepik) -
लसीकरण (Vaccinations)-
कॉलरा, टायफाइड आणि हिपॅटायटिस ए यांसारख्या आजारांपासून सुरक्षित राहण्यासाठी जवळच्या हेल्थ केअरमध्ये जा आणि लसीकरण करा. अशा आजारांचा धोका असणाऱ्या भागात तुम्ही जर दररोज प्रवास करत असाल तर तुम्ही लसीकरण करणे आवश्यक आहे. (Photo : Freepik)
Healthy Lifestyle : पावसाळ्यात आजारी पडू नये, म्हणून कशी काळजी घ्यावी?
UNDAC आणि जिनिव्हा येथील सार्वजनिक आरोग्यप्रमुख डॉ. सबिन कापासी यांनी पावसाळी आजारांपासून स्वत:ला कसे वाचवायचे, यासाठी काही खास टिप्स दिल्या आहेत. चला तर जाणून घेऊ या.
Web Title: Healthy lifestyle monsoon health care how to prevent from waterborne diseases in monsoon rainy season ndj