• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • दिल्ली स्फोट
  • धर्मेंद्र
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. healthy lifestyle do you walk for 10 thousands steps every day for weight loss then read what expert told ndj

Weight Loss : वजन कमी करण्यासाठी दररोज १० हजार पावले चालता? मग हे आधी वाचा

तुम्ही दररोज किती पावले चालता? वजन कमी करण्यासाठी तुम्ही दररोज १० हजार पावले चालता का? मग थांबा! कारण- तज्ज्ञांच्या मते, वजन कमी करण्यासाठी ही कृती करणे चुकीचे आहे.

July 1, 2024 18:45 IST
Follow Us
  • do you walk for 10K steps every day
    1/9

    तुम्ही दररोज किती पावले चालता? वजन कमी करण्यासाठी तुम्ही दररोज १० हजार पावले चालता का? (Photo : Freepik)

  • 2/9

    मग थांबा! कारण- तज्ज्ञांच्या मते, वजन कमी करण्यासाठी ही कृती करणे चुकीचे आहे. (Photo : Freepik)

  • 3/9

    कारण- हा काही जादूचा प्रयोग नाही. त्यामुळे ज्या लोकांचे वजन जास्त आहे आणि जे गुडघेदुखीने त्रस्त आहेत त्यांनी १० हजार पावले चालणे चुकीचे आहे. (Photo : Freepik)

  • 4/9

    आतड्यांचे आरोग्य तज्ज्ञ (gut health specialist) डॉ. संध्या लक्ष्मी सांगतात, “जेव्हा लठ्ठ लोक दररोज १० हजार पावले चालण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांच्यावर खूप ताण येतो आणि त्यांना सांधेदुखी, स्नायूंचा त्रास होऊ शकतो. कारण- त्यांचे स्नायू १० हजार पावले चालणे सहन करू शकत नाहीत.” (Photo : Freepik)

  • 5/9

    त्या सांगतात, “ज्या लोकांना गुडघ्याशी संबंधित समस्या आहेत त्यांनी प्रशिक्षणाशिवाय १० हजार पावले चालू नयेत. (Photo : Freepik)

  • 6/9

    मुंबईच्या परळ येथील ग्लेनिगल्स हॉस्पिटलचे ऑर्थोपेडिक्स वरिष्ठ सल्लागार डॉ. अनूप खत्री सांगतात, “वरील सल्ला हा मंद गतीची चयापचय क्रिया, आनुवंशिकता व चुकीची जीवनशैली यांमुळे लठ्ठपणा असलेल्या लोकांसाठीसुद्धा आहे.” ते पुढे सांगतात, “चालणे हा वजन कमी करणे किंवा तीव्र स्वरूपाचा व्यायाम नसून, शरीराला लवचिक बनविण्याचा तो एक प्रभावी मार्ग आहे.” (Photo : Freepik)

  • 7/9

    पुणे येथील ज्युपिटर हॉस्पिटलचे ऑर्थोपेडिक व रोबोटिक सर्जन डॉ. निर्मल डुमणे सांगतात, “योग्य प्रशिक्षणाशिवाय १० हजार पावले चालण्याने तुमची अस्वस्थता वाढू शकते. त्याशिवाय तुम्हाला दुखापत होऊ शकते किंवा दीर्घकालीन स्नायू वा सांध्यांची समस्याही उदभवू शकते.” (Photo : Freepik)

  • 8/9

    ते पुढे सांगतात, ” शरीराला आधार देणारे स्नायू जेव्हा कमकुवत होतात तेव्हा कोणतीही शारीरिक हालचाल करताना व्यक्तीला आणखी दुखापत होऊ शकते.” (Photo : Freepik)

  • 9/9

    डॉ. अनूप खत्री सांगतात, “लठ्ठपणामुळे स्नायू कमकुवत होतात आणि मग त्यावर थोडा जरी जास्त तणाव आला तरी अस्वस्थता जाणवते आणि शरीरावर ताण येऊ शकतो. दररोज १० हजार पावले चालण्यापूर्वी आपले शरीर निरोगी आणि तंदुरुस्त ठेवणे आवश्यक आहे.” (Photo : Freepik)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleहेल्थ टिप्सHealth Tipsहेल्थ न्यूजHealth News

Web Title: Healthy lifestyle do you walk for 10 thousands steps every day for weight loss then read what expert told ndj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.