-
Fungal Infection: पावसाळा सुरु झाल्यामुळे अखेर उन्हाच्या तडाख्यापासून मिळाला आहे. पावसाळ्यात आरोग्याची अधिक काळजी घ्यावी लागते. पावसाळा सुरू झाला की अनेक असे आजार होतातच. पावसाळ्यात अनेक आजार आणि संसर्ग पसरण्याचा धोका जास्त असतो. (Photo: Freepik)
-
पावसाळ्यात आपण भिजल्यामुळे फंगल इन्फेक्शन म्हणजे बुरशीजन्य आजार होण्याचा धोकाही जास्त असतो. त्यामुळे पावसाळ्यात फंगलसारख्या इन्फेक्शनना बळी पडण्याची वेळ येते. असं होऊ नये म्हणून काय करायचं ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.(Photo: Freepik)
-
सर्वात महत्त्वाचे म्हणजे पुरेसे पाणी प्यायल्याने तुमची त्वचा निरोगी राहते आणि शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत होते. योग्य आहार घ्या.(Photo: Freepik )
-
जीवनसत्त्वे आणि खनिजे समृद्ध आहारामुळे तुमची प्रतिकारशक्ती मजबूत होते, यामुळे तुमचं शरीर फंगल इन्फेक्शन प्रतिरोधक होईल.(Photo: Freepik )
-
जास्त ओलाव्यामुळे त्वचेवर बुरशीची वाढ होऊ शकते. जेव्हा आपण पावसात भिजून येतो त्यानंतर आपली संपूर्ण त्वचा पुसून कोरडी करावी. (Photo: Freepik )
-
बुरशीचा धोका हाताखाली, पायांच्या जांघांमध्ये, स्तन आणि पायांची बोटे यांच्यामध्ये जास्त असतो, म्हणून हे भाग चांगले पुसून कोरडे करावेत.(Photo: Freepik )
-
बोटांच्या मधील जागाही नीट टिपून कोरडी करावी. मीठ हे अँटी-बॅक्टेरिअल असते, त्यामुळे सूज आणि इन्फ्केशन कमी होण्यास मदत होते. तसेच त्यामुळे जळजळ व खाजेचा त्रासही कमी होतो.(Photo: Freepik )
-
टॉवेल, कपडे किंवा शूज यांसारख्या वैयक्तिक वस्तू कुणाच्या वापरुही नका आणि कुणाला वापरायला देऊही नका.कारण यामुळे बुरशीजन्य संसर्ग एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरण्याचा धोका वाढू शकतो.(Photo: Freepik )
-
पावसाळ्यात फंगल इंफेक्शनचा जास्तच त्रास होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला जरुर घ्यावा.(Photo: Freepik )
पावसाळ्यात त्वचेला होणारे फंगल इन्फेक्शन कसे टाळायचे? ‘हे’ ४ उपाय फॉलो करा आणि मिळवा आराम
Halth tips: पावसाळ्यात आरोग्याची योग्यप्रकारे काळजी घेण्याची गरज असते. नाहीतर या फंगलसारख्या इन्फेक्शनना बळी पडण्याची वेळ येते. असं होऊ नये म्हणून काय करायचं ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
Web Title: Fungal infection in monsoon how to effectively ward off fungal infections during the monsoon season srk