• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • डोनाल्ड ट्रम्प
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. speak about 7 things in an interview a golden opportunity you will get job easily ndj

Job Interview : फक्त मुलाखतीदरम्यान ‘या’ सात गोष्टी न चुकता सांगा आणि संधीचे सोने करा

आज आम्ही तुम्हाला अशा सात गोष्टी सांगणार आहोत ज्या तुम्ही मुलाखतीत बोलायला पाहिजे. त्या गोष्टी कोणत्या, जाणून घेऊ या.

August 3, 2024 18:46 IST
Follow Us
  • Job Interview
    1/9

    सध्या नोकरी मिळविणे खूप अवघड झाले आहेत. प्रत्येक जण नोकरीच्या शोधात दिसतो. अनेकदा नोकरीच्या संधी समोर येतात पण आपण त्या संधीचे सोने करू शकत नाही. मुलाखतीच्या वेळी स्वत:विषयी नीट माहिती न सांगितल्यामुळे आपण समोर आलेली संधी गमावतो. (Photo : Freepik)

  • 2/9

    आज आम्ही तुम्हाला अशा सात गोष्टी सांगणार आहोत ज्या तुम्ही मुलाखतीत बोलायला पाहिजे. त्या गोष्टी कोणत्या, जाणून घेऊ या. (Photo : Freepik)

  • 3/9

    कंपनी जे काम करते, त्याविषयी तुम्हाला माहिती आहे
    तुम्ही ज्या कंपनीसाठी अर्ज केला आहे, त्या कंपनीसाठी तुम्ही उत्सुक आहात आणि तिथे ज्या प्रकारे काम केले जाते, त्या कामात तुम्ही अव्वल आहात, मुलाखती दरम्यान याची जाणीव करून द्याल. जास्तीत जास्त वेळ कंपनीविषयी आणि कंपनीच्या कामाविषयी बोला. (Photo : Freepik)

  • 4/9

    तुम्ही कोणत्याही परिस्थितीत काम करू शकता.
    कामाचे वातावरण प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे असते. कंपनीला अशी व्यक्ती हवी असते जी कोणत्याही परिस्थितीत काम करण्यास तयार असेल. आजच्या या आव्हानात्मक जगात प्रत्येक व्यक्तीमध्ये कोणत्याही परिस्थितीत काम करण्याची क्षमता असायला हवी. (Photo : Freepik)

  • 5/9

    तुम्ही ऊर्जावान आहात आणि तुमचा दृष्टिकोन सकारात्मक आहे
    जेव्हा तुम्ही मुलाखतीला जाता तेव्हा तुम्ही हे सिद्ध करून द्या की तुम्ही कोणतेही काम करण्यासाठी ऊर्जावान आहात आणि तुमचा दृष्टिकोन सकारात्मक आहे त्यामुळे कंपनीला तुमच्या बरोबर काम करण्यास इच्छा निर्माण होईल. (Photo : Freepik)

  • 6/9

    तुमचा अनुभव सांगा
    मुलाखतीच्या वेळी तुम्ही जितके तुमच्या कामाविषयी सांगाल तितके तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. मुलाखती दरम्यान तुम्हाला आलेले चांगले वाईट अनुभव सांगा ज्यामुळे तुमची कार्यक्षमता समोरच्याला दिसून येईल. (Photo : Freepik)

  • 7/9

    टीमवर्क विषयी सांगा
    जर तुम्ही कामाच्या ठिकाणी टीमबरोबर मिळून काम करत असाल तर त्याचा कंपनीला फायदा होतो. तुम्ही आजवर केलेल्या टीमवर्कविषयी सांगा आणि तुम्हाला मिळालेल्या यशाविषयी बोला. कारण कंपनी अशा कर्मचार्‍याच्या शोधात असते जे टीमबरोबर मिळून काम करतात. (Photo : Freepik)

  • 8/9

    तुमच्या क्षेत्रात तज्ज्ञ व्हायची इच्छा आहे
    कंपनी नेहमी अशा कर्मचार्‍याच्या शोधात असतात जे स्वत:चा विकास करू इच्छितात. जर तुम्ही तुमच्या क्षेत्रात तज्ज्ञ होण्याची इच्छा मुलाखतीत व्यक्त केली तर यावरून तुमची इच्छा शक्ती आणि काम करण्याची क्षमता दिसून येते. (Photo : Freepik)

  • 9/9

    तुम्ही प्रेरणादायी व्यक्ती आहात, हे सांगा
    प्रेरणादायी कर्मचारी हे खूप क्रिएटिव्ह असतात. प्रेरणादायी व्यक्तिमत्व नेहमी कंपनीला पुढे नेण्याचा विचार करतात. कंपनी अशाच कर्मचार्‍यांच्या शोधात असतात. (Photo : Freepik)

TOPICS
जॉबJobलाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle Newsसरकारी नोकरीGovt Jobs

Web Title: Speak about 7 things in an interview a golden opportunity you will get job easily ndj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.