-
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, एका ठराविक कालावधीनंतर प्रत्येक ग्रह त्याच्या स्थितीमध्ये बदल करतो. शुक्र ग्रह हा संपत्ती, समृद्धी, भौतिक सुख, आनंद, प्रेम यांचा कारक मानला जातो.
-
ज्या व्यक्तीच्या कुंडलीत शुक्र ग्रह हा व्यवस्थित असतो, तेव्हा त्या व्यक्तीचं नशीब सुद्धा साथ देत असतं, असे मानले जाते. आता येत्या २५ आॅगस्ट रोजी ०१.२५ वाजता शुक्रदेव कन्या राशीत गोचर करणार आहेत.
-
१८ सप्टेंबरपर्यंत याच राशीत राहणार आहेत. त्यामुळे काही राशींना बक्कळ धनलाभ होण्याची शक्यता आहे. जाणून घेऊया या भाग्यशाली राशी कोणत्या…
-
शुक्रदेवाच्या गोचरामुळे वृषभ राशीच्या लोकांना भरपूर फायदा होण्याची शक्यता आहे. या काळात या राशीतील लोकांना व्यवसायात फायदा होण्याची शक्यता आहे. पैशाची बचत करण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकता. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. तुम्हाला मुलांशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते.
-
शुक्राचं गोचर कर्क राशीसाठी फायदेशीर ठरू शकते. तुम्हाला व्यवसायात नफा मिळू शकतो. उत्पन्नात घसघशीत वाढ होण्याची शक्यता आहे. अचानक मोठा आर्थिक लाभ होऊ शकतो. या काळात तुम्ही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता.
-
शुक्रदेवाचे राशी परिवर्तन कन्या राशीच्या लोकांसाठी लाभदायी ठरु शकते. या काळात मालमत्ता आणि वाहन खरेदी करू शकता. व्यवसायात सतत नफा मिळू शकतो. या काळात तुम्ही पैसा कमवण्यात आणि संपत्ती जमा करण्यात यशस्वी व्हाल.
-
वृश्चिक राशीच्या लोकांना शुक्रदेवाच्या कृपेने मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे. तुम्हाला गुंतवणुकीतून मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी यश मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या सर्व मनोकामना या काळात पूर्ण होऊ शकतात. इतकंच नाही तर उत्पन्नाचे अनेक स्त्रोत निर्माण होऊ शकतात.
-
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)
-
(फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
उद्यापासून ‘या’ राशीच्या व्यक्तींना मिळणार पैसा, प्रेम अन् प्रसिद्धी? ‘धनाचा दाता’ राशी बदल करताच सोन्यासम चमकणार नशीब!
Venus Transit 2024: शुक्रदेवाच्या राशी परिवर्तनाने काही भाग्यवान राशींना धन-संपत्ती, नोकरी आणि प्रत्येक कामात यश मिळण्याची शक्यता आहे.
Web Title: Shukra gochar 2024 venus transit in kanya these zodiac sign will be rich pdb