-

Drink lauki juice once a week : दुधी भोपळा अनेकांना आवडत नाही. घरात दुधी भोपळ्याची भाजी असेल, तर बरेच जण नाक मुरडतात; पण या अनेकांच्या नावडत्या दुधी भोपळ्याच्या भाजीत खूप पौष्टिक गुणधर्म आहेत. दुधी वजन कमी करण्यास आणि पचनक्रिया चांगली ठेवण्यास मदत करतो. (फोटो : Freepik)
-
या भाजीमध्ये व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, फायबर, पोटॅशियम व लोह मुबलक प्रमाणात असतं. दुधी आहारात घेतल्यानं हाडं मजबूत होतात. तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही; मात्र दुधी खाल्ल्यानं तणावदेखील कमी होतो. तसेच केस गळतीची समस्या असलेल्या महिलांनीही याचा समावेश आहारात करावा. त्यामुळे जर तुम्हाला दुधी भोपळा आवडत नसेल, तर तुम्ही ज्युस करून त्याचं सेवन करू शकता.(फोटो : Freepik)
-
दरम्यान, आठवड्यातून एकदा दुधी भोपळ्याचा रस प्यायल्यास शरीरावर काय परिणाम होतात ते जाणून घ्या. दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना, हैदराबादच्या यशोदा हॉस्पिटलचे वरिष्ठ सल्लागार व फिजिशियन डॉ. दिलीप गुडे यांनी याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.(फोटो : Freepik)
-
रक्तदाब आणि रक्तातील साखरेचे प्रमाण, कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होणं आणि त्यामुळे हृदयविकार कमी होणं हे दुधी भोपळ्याच्या रसाच्या सातत्यपूर्ण सेवनामुळे साध्य होत असल्याचं डॉ. गुडे यांनी सांगितलं.(फोटो : Freepik)
-
दुधी भोपळ्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे उन्हाळ्यात याचं सेवन केल्यानं शरीर हायड्रेट राहतं. त्यामुळे उन्हाळ्याच्या कडक उन्हाचा त्रास कमी होतो. ही बाब शरीराचं तापमान नियंत्रित करण्यास आणि उष्माघात टाळण्यासाठी मदत करू शकते.(फोटो : Freepik)
-
दुधी भोपळ्याच्या रसामध्ये अल्कधर्मी गुणधर्म असतात. त्यामुळे छातीत जळजळ आणि अपचनापासून आराम मिळतो.(फोटो : Freepik)
-
दुधी भोपळ्यामधील फायबर तुम्हाला जास्त काळ पोट भरलेेलं राखण्यास मदत करतं, भूक कमी करतं आणि कॅलरीज कमी असल्यामुळे वजन नियंत्रणास मदत होते.(फोटो : Freepik)
-
दुधी भोपळ्यामधील उच्च पाण्याचं प्रमाण तुमच्या त्वचेला आतून हायड्रेट ठेवण्यास मदत करतं.(फोटो : Freepik)
-
दुधी भोपळ्याच्या रसाच्या सेवनामुळे केस पातळ होणं, टक्कल पडणं इत्यादी समस्यांपासून सुटका मिळते. केसांसाठी दररोज एक ग्लास दुधीचा रस प्यायल्यास फायदा होतो. (फोटो : Freepik)
महिलांनो केस गळती रोखण्यासाठी आठवड्यातून फक्त एकदा “दुधी”चा रस प्या; फायदे वाचून अवाक् व्हाल
Drink lauki juice benefits: दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना, हैदराबादच्या यशोदा हॉस्पिटलचे वरिष्ठ सल्लागार व फिजिशियन डॉ. दिलीप गुडे यांनी याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.
Web Title: Find out what happens to the body if you drink lauki juice once a week health benefits of doodhi lauki bottle gourd srk