-
ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन होते; ज्याचा शुभ किंवा अशुभ प्रभाव १२ राशींपैकी काही राशीच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
ज्योतिषशास्त्रात गुरू ग्रहाला ज्ञान, सौभाग्य आणि सुख-समृद्धीचा कारक ग्रह मानले जाते. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
गुरू ग्रहाला एका राशीत प्रवेश करण्यासाठी जवळपास १२ वर्षांचा कालावधी लागतो. तसेच ठराविक वेळेनंतर गुरू ग्रहाचे नक्षत्र परिवर्तनदेखील होते. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
पंचांगानुसार, गुरू ग्रह सध्या मृगशिरा नक्षत्रामध्ये उपस्थित असून तो २८ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजून १० मिनिटांनी रोहिणी नक्षत्रामध्ये प्रवेश करेल. या नक्षत्रामध्ये तो १० एप्रिल २०२५ पर्यंत राहील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
त्यामुळे हा काळ काही राशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत फायदेशीर असेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
गुरू ग्रहाच्या नक्षत्र परिवर्तनाने वृषभ राशीच्या व्यक्तींना आयुष्यात अनेक बदल पाहायला मिळतील. या काळात तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. समाजात मान-सन्मान, प्रतिष्ठा वाढेल. गुंतवणूकीतून चांगले पैसे मिळवाल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
गुरू ग्रहाच्या नक्षत्र परिवर्तनाचा कर्क राशींच्या व्यक्तींना सकारात्मक परिणाम पाहायला मिळेल. या काळात कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. अचानक धनलाभ होतील, या काळात मकर राशीच्या व्यक्तींना अनेकदा कामामुळे दूरचे प्रवास करावे लागतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी गुरू ग्रहाचे नक्षत्र परिवर्तन खूप लाभदायी सिद्ध होईल. या काळात तुम्हाला आकस्मिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. अनेक दिवसांरपासून सुरू असणाऱ्या समस्या दूर होतील. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
२८ नोव्हेंबरपासून भाग्य चमकणार; गुरूचे नक्षत्र परिवर्तन देणार भाग्याची साथ
Jupiter’s Nakshatra Transformation: गुरू ग्रहाला एका राशीत प्रवेश करण्यासाठी जवळपास १२ वर्षांचा कालावधी लागतो. तसेच ठराविक वेळेनंतर गुरू ग्रहाचे नक्षत्र परिवर्तनदेखील होते.
Web Title: Fortune will shine from november 28 jupiters nakshatra transformation will give the support of fortune sap