• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. do you fitness secret of shehnaaz gill read more about shehnaaz gill diet plan ndj

Shehnaaz Gill’s Diet Plan : शहनाज गिलचे फिटनेस सिक्रेट माहीत आहे? जाणून घ्या, तिचे डाएट प्लान

Shehnaaz Gill fitness secret : शहनाज गिल संतुलित आणि घरगुती पदार्थांचा आहारात समावेश करते. संतुलित आणि घरगुती जेवणाचे फायदे जाणून घेऊया.

September 12, 2024 07:17 IST
Follow Us
  • Shehnaaz Gill's fitness routine
    1/9

    निरोगी आरोग्यासाठी आहार हा खूप महत्त्वाचा घटक आहे. उत्तम फिटनेससाठी तुम्ही कोणता आहार घेता हे खूप महत्त्वाचे आहे. अभिनेत्री शहनाज गिल आहाराचे महत्त्व सांगते. ती सांगते, “मी दिवसभरात तीन-चार लिटर भरपूर पाणी पिते, भिजवलेले ड्रायफ्रुट्स खाते, तसेच पोह्यांबरोबर ग्रॅनोला आणि दही खाते.” (Photo : Shehnaaz Gill/ Instagram)

  • 2/9

    शहनाज दुपारच्या जेवणात घरी बनवलेले वरण, भाजी पोळीबरोबर खाते. जेवणात ती तूपाचा समावेश करते. (Photo : Shehnaaz Gill/ Instagram)

  • 3/9

    शहनाज पुढे सांगते, “मी भाजलेल्या मखानासारखे घरगुती स्नॅक बनवते आणि खाते. रात्रीच्या जेवणामध्ये सूप, खिचडी आणि दहीसारखे हलके पदार्थ खाते. (Photo : Shehnaaz Gill/ Instagram)

  • 4/9

    वजन, निरोगी आरोग्य आणि फिटनेस नियंत्रित ठेवण्यासाठी संतुलित आहार घ्या. अहमदाबादच्या नारायणा हॉस्पिटल येथील डायबेटोलॉजिस्ट (Diabetlogist) डॉ. जुझर रंगवाला सांगतात, “तुमच्या जेवणात भरपूर फळे, भाज्या, धान्ये आणि प्रोटिन्सचा समावेश करा. कार्बोहायड्रेट्स, साखर आणि खराब फॅटयुक्त पदार्थांचा आहारात कमी समावेश करा. त्याऐवजी सतत ऊर्जा देणारे आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करणारे पौष्टिक पदार्थ निवडा.” (Photo : Shehnaaz Gill/ Instagram)

  • 5/9

    महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या.
    एखादा ‘चीट डे’ पाळण्याऐवजी ‘चीट जेवणा’चा आनंद घ्या. कार्ब्सचे कमी सेवन करा. कमीत कमी १० ते १२ ग्लास पाणी प्या. आहारात प्रोटिन्सचे प्रमाण वाढवा. (Photo : Shehnaaz Gill/ Instagram)

  • 6/9

    मीरा रोड येथील वॉकहार्ट हॉस्पिटलचे जनरल लॅप्रोस्कोपिक, मेटाबॉलिक आणि बॅरिएट्रिक सर्जरी (general laparoscopic, metabolic and bariatric surgery ) सल्लागार डॉ. राजीव मानेक सांगतात, “जर तुम्ही वजन कमी करत असाल तरीसुद्धा तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.” (Photo : Shehnaaz Gill/ Instagram)

  • 7/9

    डॉ. राजीव मानेक पुढे सांगतात, “वजन पुन्हा वाढू नये म्हणून तुमचे उद्दिष्ट निश्चित करा आणि त्यानुसार हळू हळू त्यासाठी प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला त्याची सवय होईल.” (Photo : Shehnaaz Gill/ Instagram)

  • 8/9

    “जेवण करताना सतर्कतेने खा. काही लोकांचे तणावात असताना किंवा नकारात्मक विचार करताना खाण्यावर नियंत्रण नसते, अशा वेळी तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि आपण काय आहार घेतो याकडे लक्ष द्या. नियमित योग किंवा ध्यान करा, ज्यामुळे तणाव कमी होऊ शकतो”, असे डॉ. मानेक सांगतात. (Photo : Shehnaaz Gill/ Instagram)

  • 9/9

    तज्ज्ञ सांगतात, “चांगल्या आहारतज्ज्ञांकडून वैयक्तिक आहाराच्या गरजा लक्षात घ्या. तसेच साखरेची पातळी स्थिर ठेवण्यास जेवणाच्या वेळा पाळा. नाश्ता, जेवण आणि स्नॅक ठराविक अंतराने घ्या. जेव्हा तुम्हाला एखादा पदार्थ आवडतो, तेव्हा तो पदार्थ अति खाऊ नका. (Photo : Shehnaaz Gill/ Instagram)

TOPICS
फिटनेसFitnessलाइफस्टाइलLifestyleशहनाझ गिलShehnaaz Gillसेलिब्रिटी फिटनेसहेल्थ न्यूजHealth News

Web Title: Do you fitness secret of shehnaaz gill read more about shehnaaz gill diet plan ndj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.