-
ज्योतिषशास्त्रात नवग्रहातील शनीला सर्वात महत्त्वपूर्ण मानले जाते. शनी एकमेव असा ग्रह आहे ज्याला जवळपास एका राशीत पुन्हा प्रवेश करण्यासाठी ३० वर्षांचा कालावधी लागतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
तसेच एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्यासाठी अडीच वर्षांचा कालावधी लागतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
ज्योतिषशास्त्रानुसार बुध सध्या कन्या राशीत विराजमान असून शनी आपल्या मूळ त्रिकोण कुंभ राशीमध्ये उपस्थित आहे. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
१८ सप्टेंबर रोजी हे दोन्ही ग्रह एकमेकांपासून १८० डिग्रीवर उपस्थित आहेत. शनी आणि बुधाच्या समोरासमोर येण्याने काही राशींच्या व्यक्तींचा जबरदस्त फायदा होईल.(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
मेष राशीच्या व्यक्तींसाठी बुध आणि शनीचा संयोग खूप लाभदायी सिद्ध होईल. या राशीत बुध पाचव्या घरात असून शनी अकराव्या घरात भ्रमण करत आहे. हा काळ आयुष्यात अनेक सकारात्मक बदल घडवून आणणारा असेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
तूळ राशीच्या व्यक्तींसाठी शनी आणि बुधाचे एकमेकांसमोर येणे सकारात्मक फळ देणारे असेल. राशीत शनी पाचव्या आणि बुध अकराव्या घरात विराजमान आहे. अडकलेले पैसे परत मिळतील. या काळात तुम्हाला अचानक धनलाभ होईल आणि अडकलेले पैसे परत मिळतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
कुंभ राशीत शनी लग्न भावात विराजमान आहे आणि बुध सातव्या घरात विराजमान आहे, त्यामुळे या राशीच्या व्यक्तींना या काळात भाग्याची साथ मिळेल. नवी संधीही मिळेल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. अडकलेली कामे पूर्ण होतील. बौद्धिक क्षमतेत वाढ होईल. उत्पन्नाचे नवे स्रोत मिळतील. स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
शनी देणार बक्कळ पैसा! बुध ग्रहासह अद्भूत संयोग; ‘या’ तीन राशींच्या व्यक्ती होणार मालामाल
Mercury transit in leo: ज्योतिषशास्त्रानुसार बुध सध्या कन्या राशीत विराजमान असून शनी आपल्या मूळ त्रिकोण कुंभ राशीमध्ये उपस्थित आहे.
Web Title: Shani wonderful conjunction with mercury the persons of these three zodiac signs will be rich sap