-
यंदा ३ ऑक्टोबरपासून नवरात्रोत्सवाला प्रारंभ होईल. नवरात्रीचे नऊ दिवस देवीला अनेक नैवेद्य दाखवले जातात. सातव्या किंवा आठव्या दिवशी कडाकण्यांच्या नैवेद्य देवीला दाखवण्यात येतो. (फोटो सौजन्य : लोकसत्ता)
-
कडाकण्यांची माळ तयार करून देव्हाऱ्यात लावण्यात येते किंवा नैवेद्य म्हणूनही देवीजवळ ठेवण्यात येते. तर आज आम्ही तुम्हाला “गुळाच्या कडाकण्या’ कशा बनवायच्या याबद्दल सांगणार आहोत. (फोटो सौजन्य : लोकसत्ता)
-
“गुळाच्या कडाकण्या’ बनवण्यासाठी तुम्हाला बेसनचे पीठ, गूळ, वेलची, हळद, मीठ, पाणी, तेल आदी साहित्य लागेल. (फोटो सौजन्य : @Freepik)
-
सगळ्यात आधी अर्धा वाटी साधं पाणी घेऊन त्यात पाव किलो गूळ मिक्स करा. कारण- पाण्यात गूळ पटकन विरघळतो. (फोटो सौजन्य : @Freepik)
-
परातीत पाव किलो बेसनाचे पीठ घेऊन त्यात गुळाचे पाणी मिक्स करून घ्यावे.बेसनच्या पिठात गुळाचे पाणी मिक्स करून घेतल्यानंतर त्यात हळद, मीठ, वेलची पूड टाकून पीठ व्यवस्थित मळून घ्यायचे. (फोटो सौजन्य : @Freepik)
-
पीठ मळून घेताना किंवा पीठ मळून झाल्यानंतर त्यावर तुम्ही तेल लावू शकता.मळून घेतलेलं पीठ १०-१५ मिनिटे किंवा अर्धा तास झाकून ठेवा.(फोटो सौजन्य : @Freepik)
-
त्यानंतर पिठाचे छोटे छोटे गोळे करून घ्या.गोळे लाटताना तुम्ही पुरीसारखे गोल आकारात लाटू शकता किंवा पिठाचे गोळे लाटून त्यावर हात ठेवून किंवा तुम्हाला ज्या आकारात कडाकणी हवी असेल, त्या आकाराच्या वस्तू तुम्ही त्याच्यावर ठेवू शकता आणि लाटून घेतलेल्या पिठाची त्याप्रमाणे रचना करून घ्या. (काही जण पाच विविध आकारात कडाकणी बनवतात. उदाहरणार्थ : खायची पाने, हाताचा ठसा, चांदणी, चंद्र किंवा पुरीच्या आकारात कडाकणी बनवल्या जातात… (फोटो सौजन्य : लोकसत्ता)
-
त्यानंतर कढईत तेल गरम करून घ्या.तेल गरम झाल्यानंतर मंद आचेवर तुम्ही लाटून घेतलेल्या पुरी कढईत सोडा आणि दोन्ही बाजूने खरपूस तळून घ्या. (फोटो सौजन्य : @Freepik)
-
अशा प्रकारे तुमच्या गुळाच्या कडाकणी खाण्यासाठी तयार… (फोटो सौजन्य : @लोकसत्ता)
Navratri Special Kadakani : खुसखुशीत “गुळाच्या कडाकण्या’ कधी खाल्ल्या आहेत का? मग रेसिपी वाचा अन् यंदा नवरात्रीला नक्की बनवा
Navratri Special Kadakani : नवरात्रीचे नऊ दिवस देवीला अनेक नैवेद्य दाखवले जातात. सातव्या किंवा आठव्या दिवशी…
Web Title: Navratri 2024 special sweet puri or kadakani note down the maharashtrian recipe in marathi asp