• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. influenza flu heart attack who is most at risk of heart attack due to influenza flu ndj

Heart attack : व्हायरल फ्लूमुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका सर्वात जास्त कोणाला आहे? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात

अयोग्य जीवनशैली, पोषक आहार न घेणे, सतत तणाव व हृदयाशी संबंधित समस्यांमुळे हृदयविकाराचा झटका येतो, हे तुम्ही अनेकदा ऐकले असेल पण व्हायरल फ्लूमुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका जास्त वाढतो, असे तुम्ही कधी ऐकले आहे का?

October 8, 2024 21:26 IST
Follow Us
  • Influenza flu & Heart attack
    1/9

    तरुणांपासून वृद्धांपर्यंत अनेकांना हृदयविकाराचा झटका आल्याचे अनेक प्रकरणे गेल्या काही वर्षांमध्ये समोर आली आहेत. अयोग्य जीवनशैली, पोषक आहार न घेणे, सतत तणाव व हृदयाशी संबंधित समस्यांमुळे हृदयविकाराचा झटका येतो, हे तुम्ही अनेकदा ऐकले असेल पण व्हायरल फ्लूमुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका जास्त वाढतो, असे तुम्ही कधी ऐकले आहे का? (Photo : Freepik)

  • 2/9

    न्यूरोलॉजिस्ट डॉ. सुधीर कुमार यांनी एक्सवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हायरल फ्लूमुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो, असे त्यांनी या व्हिडीओमध्ये सांगितले आहेत.
    डॉ. सुधीर कुमार या व्हिडीओमध्ये सांगतात, “फ्लू झाल्यानंतर हृदयविकाराचा धोका वाढतो. अलीकडे यावर अभ्यास करण्यात आला. त्यातून समोर आलेल्या माहितीनुसार, फ्लू झाल्यानंतर १ ते ७ दिवसामध्ये हृदयविकाराचा झटका सहा पटीने वाढतो.” (Photo : Freepik)

  • 3/9

    बंगळुरू येथील एमबीबीएस, एमडी, जनरल मेडिसिन, फिजिशियन सल्लागार डॉ.पल्लेती सिवा कार्तिक रेड्डी (Dr Palleti Siva Karthik Reddy) दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगतात, “मी प्रत्यक्ष पाहिलं आहे की व्हायरल फ्लू, वेदना आणि ताप यांच्या पलीकडे कसा वाढतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल की साधारण श्वसन संसर्गामुळे हृदय विकाराचा झटका येण्याचा धोका वाढू शकतो.” (Photo : Freepik)

  • 4/9

    डॉ. रेड्डी पुढे सांगतात, “ व्हायरल फ्लू(इन्फ्लूएंझा) तुमच्या शरीरात एक दाहक प्रतिक्रिया (inflammatory response) निर्माण करते. या प्रतिक्रियेमुळे तुमच्या धमन्यांमध्ये सूज येऊ शकते ज्यामुळे धमन्यांमध्ये असलेल्या प्लेक अस्थिर होऊ शकतात आणि तुटू शकतात ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो” (Photo : Freepik)

  • 5/9

    या फ्लूमुळे तुमच्या शरीरातील रक्त सुद्धा गोठू शकते, ज्यामुळे तुमच्या रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका वाढतो. या रक्ताच्या गुठळ्या हृदयात रक्त प्रवाह रोखत असेल तर तुम्हाला हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. (Photo : Freepik)

  • 6/9

    फ्लूमुळे येणारा ताप, हृदयाचे ठोक्यांमध्ये अनियमितपणा आणि फ्लू दरम्यान तुमच्या शरीरावर येणारा एकूण ताण यामुळे तुमच्या हृदयावर परिणाम होऊ शकतो. आधीच खूप जास्त कामाचा स्ट्रेस असलेल्या लोकांना किंवा हृदयविकारासंबंधित आजार असलेल्या लोकांना हृदय विकाराचा झटका येऊ शकतो.
    डॉ. रेड्डी सांगतात, “काही प्रकरणांमध्ये, फ्लू थेट हृदयाच्या स्नायूंवर परिणाम करू शकतो, ज्यामुळे छातीत जळजळ निर्माण होऊ शकते आणि हृदयाचे कार्य बिघडू शकते.” (Photo : Freepik)

  • 7/9

    आपले जसे वय वाढते तशी आपली रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. यामुळे वयोवृद्ध लोकांना फ्लू लवकर होतो आणि वयानुसार त्यांच्या हृदयाच्या समस्या सुद्धा वाढतात (Photo : Freepik)

  • 8/9

    ज्या लोकांना आधीपासूनच हृदयाशी संबंधित समस्या आहेत. उच्च रक्तदाब किंवा इतर हृदय व रक्तवाहिन्यासंबंधित आजारांचा धोका आहे, त्यांना फ्लूनंतर हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका जास्त असतो. (Photo : Freepik)

  • 9/9

    ज्या लोकांची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत आहे, कर्करोगाचा उपचार घेत असलेल्या किंवा एचआयव्ही/एड्स सारखे आजार असलेल्या लोकांना फ्लूसह हृदयाशी संबंधित आजारांचा धोका जास्त असतो. (Photo : Freepik)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleहेल्थHealthहेल्थ टिप्सHealth Tipsहेल्थ न्यूजHealth Newsहेल्दी लाइफस्टाइलHealthy Lifestyle

Web Title: Influenza flu heart attack who is most at risk of heart attack due to influenza flu ndj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.