• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. how the strength of a handshake can indicate cardiovascular health know handshake and heart connection ndj

Cardiovascular Health : हस्तांदोलनावरून ओळखा हृदय व रक्तवाहिन्यांचे आरोग्य; जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात

Cardiovascular Health : हस्तांदोलन ही फक्त अभिवादन करण्याची पद्धत नाही; तर व्यावसायिक क्षेत्रात याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पण, तुम्हाला माहीत आहे का की हस्तांदोलनाचा थेट संबंध आपल्या हृदय व रक्तवाहिन्यांशी येतो.

October 10, 2024 16:03 IST
Follow Us
  • Handshake and Heart Connection
    1/12

    हस्तांदोलन ही फक्त अभिवादन करण्याची पद्धत नाही; तर व्यावसायिक क्षेत्रात याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पण, तुम्हाला माहीत आहे का की हस्तांदोलनाचा थेट संबंध आपल्या हृदय व रक्तवाहिन्यांशी येतो. तुम्हाला वाटेल हे कसं शक्य आहे; पण हे खरंय. (Photo : Freepik)

  • 2/12

    न्युट्रिशनिस्ट व कन्टेट क्रिएटर दीपशिखा जैन सांगतात, “जेव्हा घट्ट हस्तांदोलन केलं जातं तेव्हा हृदय जास्त प्रमाणात रक्ताभिसरण करतं, जो हृदयाचं आरोग्य चांगलं असल्याचा पुरावा आहे.” हस्तांदोलन करताना तुमची हाताची पकड कमकुवत असेल, तर तो हृदयाचं आरोग्य खराब असल्याचे संकेत आहे.” (Photo : Freepik)

  • 3/12

    स्नायूंची ताकद आणि हृदय व रक्तवाहिन्यांशी संबंधित फिटनेस : हाताच्या घट्ट पकडीवरून एकूणच स्नायूंच्या ताकदीचा अंदाज लावता येतो. काही अभ्यासांतून असे सूचित करण्यात आले आहे की, हाताची मजबूत पकड असलेल्या लोकांच्या हृदयाची कार्यक्षमता चांगली असते आणि रक्तदाब कमी असतो. तसेच हृदय व रक्तवाहिन्यांशी संबंधित आरोग्य उत्तम असते. कारण- मजबूत स्नायूंना ऑक्सिजन आणि पोषक घटक मिळविण्यासाठी हृदय व रक्तवाहिन्या मदत करतात. (Photo : Freepik)

  • 4/12

    जळजळ आणि ऑक्सिडेटिव्ह ताण : हातांची कमकुवत पकड छातीत जळजळ आणि ऑक्सिडेटिव्ह तणावाशी संबंधित आहे. कारण- या दोन्ही गोष्टींमुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. (Photo : Freepik)

  • 5/12

    एंडोथेलियल कार्य : एंडोथेलियम हा आपल्या रक्तवाहिन्यांवरील एक थर असतो जो हृदय व रक्तवाहिन्यांशी संबंधित आरोग्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो. हाताची चांगली पकड असणे म्हणजे एंडोथेलियल कार्य चांगले असणे होय. म्हणजेच मजबूत हाताची पकड तुमच्या रक्तवाहिन्या निरोगी असल्याचे दर्शवते. (Photo : Freepik)

  • 6/12

    डॉ. हिरेमठ सांगतात, “मजबूत हस्तांदोलनामध्ये प्रामुख्याने हाताच्या स्नायूंचा सहभाग असतो, बोटे व मनगट वाकवणाऱ्या आणि नियंत्रित करणाऱ्या फ्लेक्सर स्नायूंचा समावेश असतो. मज्जासंस्था (nervous system) या स्नायूंमध्ये समन्वय साधण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे हातांची घट्ट पकड केवळ स्नायूंची ताकदच नाही, तर चेतासंस्थेचे (neuromuscular system)चे चांगले कार्यसुद्धा दर्शवते.” (Photo : Freepik)

  • 7/12

    हाताची पकड तुम्ही हळूहळू सुधारू शकता. त्यामुळे तुमच्या हृदयाच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम दिसून येईल. डॉ. हिरेमठ यांनी सांगितलेल्या काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. (Photo : Freepik)

  • 8/12

    विशिष्ट व्यायाम करा : हॅण्ड ग्रिपर्स, डेडलिफ्ट्स, पुल-अप्स आणि जड वस्तू घेऊन चालणे यांसारख्या व्यायामामुळे हाताची पकड मजबूत करता येते (Photo : Freepik)

  • 9/12

    स्ट्रेंथ ट्रेनिंग : नियमित स्ट्रेंथ ट्रेनिंग स्नायूचे आरोग्य सुधारण्यास आणि ताकद वाढविण्यास मदत करते; ज्याचा फायदा तुम्हाला हाताच्या पकडीमधून दिसून येईल. (Photo : Freepik)

  • 10/12

    हृदय व रक्तवाहिन्यांशी संबंधित व्यायाम : तुमचे हृदय निरोगी ठेवण्यासाठी आणि हृदय व रक्तवाहिन्यांशी संबंधित आरोग्य सुधारण्यासाठी नियमित धावणे, पोहणे किंवा सायकल चालवणे यांसारखे व्यायाम करा. (Photo : Freepik)

  • 11/12

    निरोगी आहार : फळे, भाज्या, धान्य आणि प्रोटीनयुक्त संतुलित आहार घ्या. स्नायूंच्या आणि हृदयाच्या चांगल्या आरोग्यासाठी पोषक घटक गरजेचे आहेत. (Photo : Freepik)

  • 12/12

    तणाव कमी करणे : कामाच्या तणावामुळे स्नायूंवरील ताण वाढतो. त्यामुळे नियमित ध्यान किंवा योगा करावा; जेणेकरून तणाव कमी करता येईल. (Photo : Freepik)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle Newsहेल्थ न्यूजHealth Newsहेल्दी लाइफस्टाइलHealthy Lifestyle

Web Title: How the strength of a handshake can indicate cardiovascular health know handshake and heart connection ndj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.