-
अंकशास्त्रानुसार, तुम्ही मूलांकनुसार व्यक्तीचे भविष्य, करिअर आणि व्यक्तिमत्त्वाविषयी जाणून घेऊ शकता. (Photo : Freepik)
-
ज्योतिषशास्त्रामध्ये १२ राशी आहेत तसेच अंकशास्त्रामध्ये १ ते ९ पर्यंत मूलांक आहे. राशींप्रमाणे प्रत्येक मूलांकचा स्वामी ग्रह असतो. (Photo : Freepik)
-
आज आपण अशा मूलांकविषयी जाणून घेणार आहोत जो कमी वयात धन, संपत्ती, वैभव आणि यश प्राप्त करतो. (Photo : Freepik)
-
मूलांक ६ असणारे लोक कमी वयातच श्रीमंत बनतात. कोणत्याही महिन्याच्या ६, १५ आणि २४ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ६ असतो. (Photo : Freepik)
-
या लोकांवर असते शुक्र ग्रहाची विशेष कृपा
मूलांक ६ असणाऱ्या लोकांचा स्वामी ग्रह शुक्र असतो जो धन, वैभव, सौंदर्य, प्रेम आणि आकर्षणाचा कारक असतो. मूलांक ६ असणाऱ्या लोकांवर शुक्र ग्रह आणि माता लक्ष्मीची विशेष कृपा असते. त्यामुळे कमी वयात हे लोक श्रीमंत बनतात. (Photo : Freepik) -
महागड्या वस्तूंची आवड
मूलांक ६ असणारे लोक जितके श्रीमंत असतात तितकाचा खर्च करतात. या लोकांना महागड्या वस्तू खरेदी करण्याची आवड असते. त्यांना लक्झरी आणि इंपोर्टेड गोष्टी खूप आवडतात. (Photo : Freepik) -
सुंदर आणि अॅक्टिव्ह
मूलांक ६ असणारे लोक दिसायला खूप सुंदर आणि आकर्षक असतात. हे लोक मन आणि शरीराने तरुण असतात. या लोकांना म्हातारपण लवकर येत नाही. त्यामुळे लोक यांच्याकडे लगेच आकर्षित होतात. (Photo : Freepik) -
कलाप्रेमी आणि फिरायला आवडते
मूलांक ६ असणारे लोक आनंदी आणि कलाप्रेमी असतात. या लोकांना चांगले जेवण, चांगले कपडे परिधान करणे आणि लक्झरी आयुष्य जगायला आवडते. हे लोक गमतीशीर स्वभावाचे असतात. त्यांच्याकडे भरपूर सकारात्मक ऊर्जा असते. या लोकांना आनंदी जीवन कसं जगायचं, हे माहीत आहे. (Photo : Freepik) -
या क्षेत्रात नाव कमावतात
मूलांक ६ असणाऱ्या लोकांना कोणत्याही क्षेत्रात तगडा पैसा मिळतो. हे लोक चित्रपट, कला, मॉडलिंग, संगीत, फॅशन डिझाइनिंग, मिडिया, ग्लॅमर इत्यादी क्षेत्रात चांगले नाव कमवतात.तसेच व्यवसाय क्षेत्रात हे लोक शुक्राशी संबंधित गोष्टी कॉस्मेटिक्स, लक्झरी वस्तू इत्यादी गोष्टींमध्ये यशस्वी होतात. (Photo : Freepik)
‘या’ तारखेला जन्मलेल्या लोकांवर राहते नेहमी लक्ष्मीची कृपा, कमी वयात होतात श्रीमंत
Numerology : आज आपण अशा मूलांकविषयी जाणून घेणार आहोत जो कमी वयात धन, संपत्ती, वैभव आणि यश प्राप्त करतो.
Web Title: Numerology zodiac signs will get money and wealth they become rich at young age ndj