-
सध्या बैठी जीवनशैली आणि पोषक आहार न घेतल्यामुळे वजन वाढीच्या समस्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. (Photo : Freepik)
-
अनेक जण वजन वाढू नये किंवा वाढलेले वजन कमी करण्यासाठी वाट्टेल ते प्रयत्न करतात. एवढंच काय तर काही लोक वजन वाढण्याच्या भीतीने भात खाणे टाळतात. (Photo : Freepik)
-
तुम्ही सुद्धा वजन वाढू नये म्हणून भात खाणे टाळता का? तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये डॉ. मानसी मेहेंदळे भात खाण्याची योग्य पद्धत सांगितली आहे. (Photo : Freepik)
-
डॉ. मानसी मेहेंदळे सांगतात, “भात खाऊन वजन वाढतं का? तर हो. भातामध्ये खूप कार्ब्स असतात. स्टार्च असतात. भातामुळे वजन वाढणार आहे. पण भात जर तुम्ही योग्य प्रमाणात घेतला, त्याचे प्रमाण योग्य ठेवले तर वजन वाढत नाही.” (Photo : Freepik)
-
त्या पुढे सांगतात, “बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो, लाल तांदूळ घेऊ का ज्यामुळे वजन वाढणार नाही पण दोघांचा ग्लायसेमिक इंडेक्स सेम आहे. त्या दोन्ही तांदळाची गुणवत्ता वेगवेगळी असते. त्याचे पोषण मुल्ये वेगवेगळे असतात, त्याने फरक पडतो.फायबर कशामध्ये जास्त आहे त्यामुळे पचन अधिक सोपे होते.” (Photo : Freepik)
-
त्यांच्या मते “भात खाताना अनेक लोकांना वाटतं की त्याबरोबर दुध घ्यावं, दही घ्यावं. नक्की घ्या. जेव्हा आपण रात्री दही भात घेतो, दुध भात घेतो कारण त्यामुळे आपल्याला शांत झोप येते कारण दह्यामध्ये व्हिटॅमिन बी१२ असते. मेलाटोनिन नावाचा हार्मोन स्त्राव होतो. त्यामुळे शांत झोपायला मदत होते. (Photo : Freepik)
-
भात आपण खाल्ला पाहिजे पण त्याचबरोबर तुम्ही काय घेता, जर तुम्ही काजू घेतले, किंवा असे पदार्थ घेतले की ज्याचे कॅलरी जास्त आहेत तर तुमचे वजन वाढेन पण उघडा भात शिजवला आणि त्यावर येणारी पेस्ट जर तुम्ही काढून टाकली तर वजन वाढत नाही. (Photo : Freepik)
-
“कोकणी माणूस भरपूर भात खातो तरी सडसडीत असतात. साउथ इंडियन लोकं भरपूर भात खातात पण सडसडीत असतात. (Photo : Freepik)
-
त्यासाठी आधी तांदुळ परतून घ्या आणि त्यानंतर त्याचा भात लावायचा म्हणजेच तुमचं वजन वाढणार नाही.” त्या सांगतात (Photo : Freepik)
Weight Gain & Rice : भात खाण्याची योग्य पद्धत जाणून घ्या, वजन अजिबात वाढणार नाही…
Weight Gain & Rice : तुम्ही सुद्धा वजन वाढू नये म्हणून भात खाणे टाळता का? तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. जाणून घेऊ या भात खाण्याची योग्य पद्धत
Web Title: Weight gain and rice check right way to make and eat rice to avoid weight gain ndj