Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. sleeping position tells about our health how you sleep and know more about health ndj

झोपण्याची स्थिती सांगते तुमचे आरोग्य; तुम्ही कसे झोपता?

Sleeping Position Reveals About Your Health : तुम्ही कोणत्या स्थितीत झोपता, यावरून तुम्ही शरीरातील कोर्टिसोल या स्ट्रेस हार्मोनच्या पातळीविषयी जाणून घेऊ शकता. याविषयी दी इंडियन एक्स्प्रेसने तज्ज्ञांच्या हवाल्याने सविस्तर माहिती जाणून घेतली

November 25, 2024 16:29 IST
Follow Us
  • Sleeping Position Reveals About Your Health
    1/12

    निरोगी आरोग्यासाठी पुरेशी झोप घेणे अत्यंत गरजेचे आहे. चांगली झोप ही फक्त निरोगी जीवनशैलीचा भाग नसून, संपूर्ण आरोग्याच्या दृष्टीने तो महत्त्वापूर्ण भाग आहे. विशेषत: तुम्ही कोणत्या स्थितीत झोपता, यावरून तुम्ही शरीरातील कोर्टिसोल या स्ट्रेस हार्मोनच्या पातळीविषयी जाणून घेऊ शकता. याविषयी दी इंडियन एक्स्प्रेसने तज्ज्ञांच्या हवाल्याने सविस्तर माहिती जाणून घेतली. (Photo : Freepik)

  • 2/12

    केअर हॉस्पिटल हायटेक सिटी येथील पल्मोनोलॉजिस्ट सल्लागार डॉ. सतीश रेड्डी सांगतात, “अनेकांच्या झोपण्याच्या स्थितीमध्ये शरीराचे स्नायू योग्यरीत्या शिथिल किंवा आरामदायी नसतात. त्यामुळे त्यांना अस्वस्थता जाणवते किंवा झोपताना त्रास उद्भवतो.” (Photo : Freepik)

  • 3/12

    छातीजवळ गुडघे घेऊन झोपणे- छातीजवळ गुडघे घेऊन, एका बाजूला वाकून झोपल्याने श्वासनाशी संबंधित समस्या उद्भवतात. त्यामुळे मान आणि पाठ यांच्यावर ताण येतो. (Photo : Freepik)

  • 4/12

    पोटावर भार देऊन झोपणे : पोटावर भार देऊन झोपल्याने मान आणि पाठीच्या खालील भागावर ताण येऊ शकतो. कारण- अशा स्थितीत झोपताना व्यक्ती श्वास घेण्यासाठी डोके एका बाजूला वळवते. (Photo : Freepik)

  • 5/12

    स्टारफिश स्थिती : या स्थितीत डोक्याच्या वर हात पसरून, पाठीवर भार देऊन झोपल्याने खांद्यामध्ये अस्वस्थता जाणवते आणि त्यामुळे काही व्यक्तींमध्ये घोरण्यासारखी लक्षणे दिसून येतात (Photo : Freepik)

  • 6/12

    एका बाजूला झोपणे : दोन्ही हात समोर ठेवून, एका बाजूला झोपल्याने खांदे आणि मान यांमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो. (Photo : Freepik)

  • 7/12

    डॉ. रेड्डी सांगतात की, दीर्घकाळ ताण किंवा शारीरिक हालचालींचा अभाव यांमुळे स्नायूंवर ताण येऊ शकतो. त्यामुळे झोपेच्या वेळी शरीराला आराम मिळत नाही. खूप टणक किंवा खूप मऊ असलेली गादी, नीट उशी नसणे किंवा खोलीचे तापमान योग्य नसल्याचा परिणाम झोपण्याच्या स्थितीवर दिसून येतो. संधिवात, फायब्रोमायल्जिया किंवा शरीराच्या वेदना यांसारख्या कारणांमुळे झोपेच्या स्थितीत अस्वस्थता जाणवते. (Photo : Freepik)

  • 8/12

    चिंता, तणाव किंवा नैराश्यामुळे स्नायूंवर ताण येतो आणि अस्वस्थता जाणवू शकते. त्यामुळे आरामदायी झोप घेता येत नाही आणि झोपण्याची योग्य स्थितीसुद्धा शोधता येत नाही. बऱ्याच लोकांना ते नियमित कसे झोपतात, याविषयीची माहितीच नसते आणि त्यामुळे ते झोपेच्या आरोग्यावर झोपण्याची स्थिती कसा परिणाम करते, हे ओळखू शकत नाहीत. (Photo : Freepik)

  • 9/12

    मन:शांती मिळविण्याचा प्रयत्न : झोपण्यापूर्वी दीर्घ श्वास घ्या. व्यायाम केल्याने मन शांत होण्यास आणि शरीराला आराम मिळण्यास, तसेच स्नायूंचा ताण कमी होण्यास मदत होते. त्यामुळे चांगली झोप घेता येते. (Photo : Freepik)

  • 10/12

    हळुवार स्ट्रेचिंग : नियमित योगासने करा. विशेषत: पाठ, मान व खांदे यांवर लक्ष केंद्रित करणारे व्यायाम करा. त्यामुळे स्नायूंचा ताण कमी करण्यास आणि शरीरामध्ये लवचिकता येण्यास मदत होते. (Photo : Freepik)

  • 11/12

    गादी-उशी आणि तापमान योग्य असणे आवश्यक : तुमची गादी आणि उशीमुळे तुमच्या शरीराला झोपताना योग्य आधार मिळतोय का, हे एकदा तपासा. तुम्हाला नीट आराम करता येईल, असे खोलीचे तापमान ठेवा. (Photo : Freepik)

  • 12/12

    झोपेच्या वेळी उत्तेजक पेये वर्ज्य : झोपेच्या वेळी कॅफिन, निकोटीन व अल्कोहोल घेणे टाळा. कारण- त्यामुळे तुमच्या झोपेत अडथळे निर्माण होऊ शकतात. परिणामत: शरीराला पुरेसा आराम मिळत नाही. (Photo : Freepik)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleहेल्थ टिप्सHealth Tipsहेल्थ न्यूजHealth News

Web Title: Sleeping position tells about our health how you sleep and know more about health ndj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.