• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. astrology people of these zodiac signs gets money and wealth by the grace of maa lakshmi ndj

‘या’ पाच राशींना मिळतो अपार पैसा, माता लक्ष्मीच्या कृपेने धनसंपत्तीची कमतरता भासत नाही

Maa Lakshmi’s Blessings : त्या राशी कोणत्या आहेत, हे आज आपण जाणून घेऊ या.

December 9, 2024 22:35 IST
Follow Us
  • Maa Lakshmi's Blessings
    1/9

    हिंदू धर्मात शुक्रवारच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करणे शुभ मानले जाते. या दिवशी माता लक्ष्मीची विविपूर्वक पूजा करून उपवास केला जातो. (Photo : Loksatta)

  • 2/9

    असं म्हणतात, जर माता लक्ष्मीच्या कृपेने तुम्हाला आयुष्यात भरपूर पैसा आणि धन मिळते पण लक्ष्मीची कृपा नसेल तर आयुष्यात आर्थिक अडचणी येतात. (Photo : Loksatta)

  • 3/9

    ज्योतिषशास्त्रानुसार, १२ राशींमधून काही राशी अशा असतात, ज्यांच्यावर माता लक्ष्मीची कृपा दिसून येते. या राशींना पैशांची कमतरता कधीही भासत नाही. (Photo : Loksatta)

  • 4/9

    त्या राशी कोणत्या आहेत, हे आज आपण जाणून घेऊ या. (Photo : Loksatta)

  • 5/9

    वृषभ राशी
    वृषभ राशीच्या लोकांवर लक्ष्मीची विशेष कृपा दिसून येते. या राशीचा स्वामी ग्रह शुक्र असतो जो धन संपत्तीचा कारक मानला जातो. वृषभ राशीचे लोक खूप मेहनती असतात आणि मेहनतीच्या जोरावर प्रत्येक ठिकाणी यश मिळवतात. या लोकांना व्यवसायात भरपूर लाभ मिळतो. माता लक्ष्मीच्या कृपेने या लोकांजवळ कधीही पैशांची कमतरता भासत नाही. (Photo : Loksatta)

  • 6/9

    सिंह राशी
    सिंह राशीचा स्वामी सूर्य असतो आणि सिंह राशीला ग्रहाचा राजा मानले जाते. सिंह राशीचे लोक खूप समजूतदार आणि तेज बुद्धीचे असतात. मेहनतीच्या जोरावर ते प्रत्येक क्षेत्रात यश मिळवतात. माता लक्ष्मीच्या कृपेने या लोकांची आर्थिक स्थिती नेहमी उत्तम राहते आणि यांना कधीही कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत घ्यावी लागत नाही. (Photo : Loksatta)

  • 7/9

    तुळ राशी (Tula Rashi)
    या राशीचा स्वामी ग्रह शुक्र आहे, जो धन आणि संपत्तीचा कारक मानला जातो. या राशीच्या लोकांवर माता लक्ष्मीची खास कृपा होते. हे लोक नेहमी सुख संपत्तीमध्ये राहतात आणि माता लक्ष्मीच्या कृपेने या लोकांना कोणत्याही प्रकारची आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत नाही. (Photo : Loksatta)

  • 8/9

    वृश्चिक राशी(Vrishchik Rashi)
    वृश्चिक राशीचा स्वामी ग्रह मंगळ असतो. ज्यांना धाडसीपणा आणि शक्तीचे प्रतिक मानले जाते. या राशीचे लोक खूप मेहनती आणि धाडसी असतात. माता लक्ष्मी या लोकांवर खूप प्रसन्न असते. या लोकांना त्यांच्या मेहनतीचे फळ कमी वयात मिळते. या लोकांजवळ नेहमी धन संपत्तीची कमतरता भासत नाही. (Photo : Loksatta)

  • 9/9

    मीन राशी (Meen Rashi)
    मीन राशी माता लक्ष्मीची प्रिय राशी मानली जाते. हे लोक खूप मेहनती असतात आणि माता लक्ष्मीची या लोकांवर कृपा दिसून येते. या लोकांची आर्थिक परिस्थिती नेहमी मजबूत राहते आणि अनेकदा यांना पितृ संपत्तीचा लाभ मिळतो. (Photo : Loksatta)

TOPICS
ज्योतिषशास्त्र आणि राशीभविष्यAstrology And Horoscopeराशीभविष्यHoroscopeराशीवृत्तRashibhavishyaलक्ष्मीची कृपादृष्टीGrace Laxmi

Web Title: Astrology people of these zodiac signs gets money and wealth by the grace of maa lakshmi ndj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.