-
थंडीच्या दिवसांत होणाऱ्या सर्दी-खोकल्यामुळे शरीरातील रोगप्रतिकार शक्ती कमकुवत होते.
-
ही रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी आणि शरीरातील उष्णता कायम ठेवण्यासाठी या पेयांचा उपयोग अत्यंत फायदेशीर ठरेल.
-
याव्यतिरिक्त या पेयांमुळे शरीरातील ऊर्जा कायम राहण्यास मदत होते.
-
विविध फायदे देणारी हे पेये कोणती यांची सविस्तर माहिती –
-
ग्रीन टी- ग्रीन टीसह लिंबू एकत्रित करून, सेवन केल्यास रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि त्यामुळे शरीर दिवसभर ताजेतवाने राहते.
-
हळदीचे दूध- प्रत्येक घरात वापरले गेलेले हे पेय म्हणजे हळदीचे दूध. हळदीच्या दुधाने घशाला येणारी खाज किंवा घशात दुखणे या समस्यांना दूर करण्यास मदत करते. रात्री झोपण्याआधी हळदीचे दूध प्यायल्याने शरीरातील थंडी पळून जाते.
-
काढा- दालचिनी, काळी मिरी, आले, तुळस व मध हे पदार्थ एकत्र करून बनविलेला काढा शरीरासाठी खूपच आरोग्यदायी आहे. या काढ्यामुळे जाणवणारी शरीरातील थंडी कमी होऊन उष्णता कायम राहते आणि सर्दी-खोकल्यापासून त्वरित आराम देते.
-
आवळ्याचा रस- क जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असलेल्या आवळ्यामधे रोगप्रतिकार शक्ती वाढविण्याचे गुण आहेत. थंडीच्या दिवसांत रोज सकाळी रिकाम्या पोटी आवळ्याचा रस प्यायल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि शरीरात उष्णता कायम राहते.
-
(सर्व फोटो सौजन्य : पेक्सएल्स )
Healthy Juices To Prevent from Cold And Cough In Winters : हिवाळ्यात सतत होणाऱ्या सर्दी-खोकल्यामुळे हैराण? या नैसर्गिक पेयांनी सर्दी-खोकल्याला करा राम राम
या पेयांच्या मदतीने सर्दी व खोकला आणि इतर हिवाळी आजारांना दूर पळवा.
Web Title: Natural drinks to avoid cold and cough in winter season pyd 04