-
मुंबई, पुणे, दिल्लीसारख्या शहरांमध्ये वायू प्रदूषणाची पातळी दिवसेंदिवस वाढत असल्याने आपल्या पाळीव प्राण्यांना निरोगी आणि सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांच्याकडे विशेष लक्ष देण्याची वेळ आली आहे, म्हणून हिवाळ्यातील थंडी वाढत असताना त्यांच्या आहारात बदल करणे योग्य आहे का? (फोटो सौजन्य: Freepik)
-
हे समजून घेण्याचे नोएडा येथील पशुवैद्यकीय डॉक्टर डॉ. पुनित कुमार गुप्ता यांचे मत जाणून घेतले. या डॉक्टरांच्या मते आहारात बदल केल्याने मोठा फरक पडू शकतो. (फोटो सौजन्य: Freepik)
-
आहारामध्ये प्रथिने, चरबी, कर्बोदके, जीवनसत्त्वे आणि खनिजे यांचा समतोल असल्याची खात्री करा. या गरजा पूर्ण करण्यासाठी बाजारात पाळीव प्राण्यांचे खाद्यपदार्थ मिळतात, परंतु जर तुम्ही घरी जेवण बनवत असाल, तर पशुवैद्य किंवा पाळीव प्राण्यांच्या पोषणतज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे,” असे डॉ. गुप्ता म्हणाले. (फोटो सौजन्य: Freepik)
-
काही मानवी अन्न पाळीव प्राण्यांसाठी हानिकारक असू शकतात. “चॉकलेट, द्राक्षे, कांदे, लसूण आणि एवोकॅडो श्वान आणि मांजरींसाठी विषारी आहेत. हे त्यांना खायला देणे टाळा आणि त्यांच्यासमोर खाणे टाळा,” असे डॉ. गुप्ता म्हणाले. (फोटो सौजन्य: Freepik)
-
प्राण्यांना अति आहारामुळे लठ्ठपणा येऊ शकतो, ही हिवाळ्यात पाळीव प्राण्यांमध्ये एक सामान्य समस्या आहे. (फोटो सौजन्य: Freepik)
-
“वयानुसार त्यांचे वजन व्यवस्थित असल्याची खात्री करण्यासाठी नियमितपणे आपल्या पशुवैद्याकडे तपासा. सहा महिन्यांपर्यंत, २४ तासांत चार वेळा जेवणाचा सल्ला दिला जातो; सहा महिने ते एक वर्षापर्यंत २४ तासांत तीन वेळा जेवण, तर एक वर्षावरील २४ तासांत दोन वेळा जेवणाचा सल्ला दिला जातो. (फोटो सौजन्य: Freepik)
-
आपल्याप्रमाणेच पाळीव प्राण्यांनाही भरपूर पाणी लागते. “त्यांना नेहमी ताजे पाणी प्यायला द्या. तुमचे पाळीव प्राणी पिण्यास नाखूष असल्यास, त्यांच्या आहारात ओले अन्न समाविष्ट करा किंवा पाळीव प्राण्यांच्या पाण्याचे फवारा वापरून हायड्रेशनला प्रोत्साहन द्या,” असे डॉ. गुप्ता म्हणाले. (फोटो सौजन्य: Freepik)
-
आपल्या पाळीव प्राण्याला ॲलर्जी, मधुमेह किंवा किडनी समस्या यांसारख्या विशिष्ट आरोग्य समस्या असल्यास त्यांच्या आहारात विशेष बदल आवश्यक असू शकतात. उदाहरणार्थ, काही पाळीव प्राण्यांना धान्य-मुक्त आहार किंवा कमी प्रथिने पर्यायांचा फायदा होऊ शकतो. योग्य सल्ल्यासाठी नेहमी आपल्या पशुवैद्याचा सल्ला घ्या. (फोटो सौजन्य: Freepik)
-
जर तुम्ही तुमच्या पाळीव प्राण्यांचा आहार बदलत असाल किंवा नवीन पदार्थ आणत असाल तर पचनक्रिया बिघडू नये म्हणून ते हळूहळू करा, असे आवाहन डॉ. गुप्ता यांनी केले. “त्यांच्या सध्याच्या अन्नामध्ये थोड्या प्रमाणात नवीन अन्न मिसळा आणि दिवसेंदिवस त्याचे प्रमाण वाढवा. डिजिटन किंवा जाइमोपेटसारखी पाचक पूरक आहाराचा समावेश करा,” असे डॉ गुप्ता म्हणाले. (फोटो सौजन्य: Freepik)
वायू प्रदूषणात पाळीव प्राण्यांची काळजी कशी घ्यावी? वाचा तज्ज्ञांचे मत
Air Pollution: आपल्या पाळीव प्राण्यांना निरोगी आणि सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांच्याकडे विशेष लक्ष देण्याची वेळ आली आहे, म्हणून हिवाळ्यातील थंडी वाढत असताना त्यांच्या आहारात बदल करणे योग्य आहे
Web Title: How to take care of pets in air pollution read expert opinion sap