• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पावसाळी अधिवेशन
  • आजचा जोक
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. standing for over two hours a day may increase the risk of developing health issues asp

दोन तासांपेक्षा जास्त वेळ उभे राहून काम करणे योग्य की अयोग्य? तज्ज्ञांनी सांगितले फायदे-तोटे

Standing Desk Increase Risk Of Health Issues : कोविड-१९ महामारीच्या काळात अनेक जण घरून काम करत होते. त्यादरम्यान उभं राहून काम करणे ही पद्धत खूप लोकप्रिय झाली. सतत बसण्यामुळे होणाऱ्या आरोग्याच्या समस्यांवर ‘उभं राहून काम करणे’ ही पद्धत काही प्रमाणात नियंत्रण मिळवू शकते असे मानले जाते, त्यामुळे ही पद्धत अनेकदा घरी आणि ऑफिसमध्येही आता वापरली…

December 20, 2024 20:26 IST
Follow Us
  • standing desk long term damage to the circulatory system in the legs
    1/10

    कोविड-१९ महामारीच्या काळात अनेक जण घरून काम करत होते. त्यादरम्यान उभं राहून काम करणे ही पद्धत खूप लोकप्रिय झाली. सतत बसण्यामुळे होणाऱ्या आरोग्याच्या समस्यांवर ‘उभं राहून काम करणे’ ही पद्धत काही प्रमाणात नियंत्रण मिळवू शकते असे मानले जाते, त्यामुळे ही पद्धत अनेकदा घरी आणि ऑफिसमध्येही आता वापरली जाऊ लागली आहे. पण नवीन अभ्यास असं सांगतो की, दीर्घकाळ उभे राहिल्याने संपूर्ण आरोग्य सुधारण्यास मदत होत नाही. (फोटो सौजन्य: @Freepik )

  • 2/10

    सिडनी युनिव्हर्सिटीच्या अलीकडील अभ्यासात असे आढळून आले आहे की, दिवसातून दोन तासांहून अधिक वेळ उभे राहिल्याने ‘डीप व्हेन थ्रोम्बोसिस’ (DVT) आणि व्हेरिकोज व्हेन्ससारख्या आरोग्य समस्या विकसित होण्याचा धोका वाढू शकतो. तर इंटरनॅशनल जर्नल ऑफ एपिडेमियोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासात यूके बायो बँकमधील ८३ हजारांहून अधिक प्रौढांच्या डेटाचे परीक्षण केले गेले. तर यावरून असा निष्कर्ष काढला गेला की, उभे राहण्याने स्ट्रोक, हार्ट फेल यांसारख्या हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी रोगांचा धोका कमी होत नाही. (फोटो सौजन्य: @Freepik )

  • 3/10

    तर यासंबंधित अधिक जाणून घेण्यासाठी द इंडियन एक्स्प्रेसने, कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलचे सल्लागार आणि हृदयरोगतज्ज्ञ डॉक्टर प्रवीण कहाळे यांच्याशी चर्चा केली. त्यांनी सगळ्या गोष्टींवर विचार केला आणि सांगितले की, बसण्यापेक्षा उभं राहून काम करणं चांगलं असलं तरीही त्यामुळे हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आरोग्यामध्ये लक्षणीय सुधारणा होत नाही. त्यामुळे काम करताना आपल्या हालचाल करणे आवश्यक आहे. कारण उभं राहिल्यामुळे आरोग्यास कोणतेही अतिरिक्त फायदे होत नाही. (फोटो सौजन्य: @Freepik )

  • 4/10

    डॉक्टर प्रवीण कहाळे यांनी दीर्घकाळ उभे राहण्याचे कोणते आरोग्य धोके आहेत हे स्पष्ट केलं आहे.
    १. डीप वेन थ्रोम्बोसिस (DVT) –
    रक्ताभिसरण कमी झाल्यामुळे नसांमध्ये, सहसा पायांमध्ये रक्ताच्या गुठळ्या (गाठ) तयार होतात. तेव्हा DVT होतो. दीर्घकाळ उभे राहिल्याने रक्तप्रवाह थांबतो आणि रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताची गाठ तयार होते. (फोटो सौजन्य: @Freepik )

  • 5/10

    २. व्हेरिकोज व्हेन्स (Varicose Veins) –
    व्हेरिकोज व्हेन्स म्हणजे अशुद्ध रक्तवाहिन्या फुगून झालेल्या गाठी. जास्त काळ उभे राहिल्याने पायांच्या नसांवर दबाव वाढतो, ज्यामुळे व्हॉल्व्ह सुजतात आणि खराब होतात. म्हणजे यादरम्यान होतं असं की, रक्त आपल्या हृदयाकडे जाण्याऐवजी शिरांमध्ये जमा होते, मग शिरा फुगतात आणि परिणामी व्हेरिकोज व्हेन्स होऊ शकतो; ज्यामुळे पायावर सूज, वेदना, अल्सरदेखील होऊ शकतो. (फोटो सौजन्य: @Freepik )

  • 6/10

    ३. वेनस इन्सफिशियन्सी (Venous Insufficiency) –
    वेनस इन्सफिशियन्सी म्हणजे शिरांच्या कार्यामध्ये समस्या निर्माण होणे. डॉक्टर प्रवीण कहाळे सांगतात की, जास्त वेळ उभे राहिल्यास पायांच्या शिरा पसरतात आणि व्हॉल्व्ह काम करत नाहीत. हे विशेषतः त्यांच्यासाठी आहे, ज्यांना उभं राहून काम करणे आवश्यक आहे. जसे की बस वाहक, कारखान्याचे कामगार. पण, ही समस्या हृदयाच्या समस्यांवर परिणाम करत नसली तरीही यामुळे पायांमध्ये मोठ्या समस्या निर्माण होऊ शकतात. म्हणजेच, वेळोवेळी याचा परिणाम पायांच्या आरोग्यावर होतो. (फोटो सौजन्य: @Freepik )

  • 7/10

    या समस्यांवर उपचार न केल्यास अशुद्ध रक्तवाहिन्या फुगून गाठ होते आणि अधिक गंभीर समस्या उद्भवू शकतात. जसे की, अल्सर. मग या सर्व समस्यांसाठी शस्त्रक्रिया किंवा रेडिओफ्रिक्वेंसी उपचारांची आवश्यकता असू शकते. या परिस्थितींचा थेट हृदयविकाराशी संबंध नाही, पण यामुळे पायांमधील रक्ताभिसरण प्रणालीची गुणवत्ता खराब होऊ शकते. (फोटो सौजन्य: @Freepik )

  • 8/10

    या समस्यांवर वेळीच उपचार केले नाहीत तर व्हेरिकोज वेन्स (varicose veins), वेनस इन्सफिशियन्सी (Venous Insufficiency) आदी गंभीर समस्या जसे की पायांवर अल्सर (ulcers) जो लवकर बरा होत नाही, निर्माण होतात. या समस्यांवर उपचार करण्यासाठी शस्त्रक्रिया किंवा रेडियोफ्रीक्वेन्सी उपचार घेणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. या समस्या थेट हृदयाच्या आजारांशी संबंधित नाहीत. पण, पायांच्या रक्ताभिसरण प्रणालीतील दीर्घकालीन नुकसान तुमच्या आयुष्यात मोठा धोका आणू शकते. त्यामुळे वेळेत उपचार घेतल्याने या समस्यांपासून तुम्ही दूर राहू शकता. (फोटो सौजन्य: @Freepik )

  • 9/10

    डॉक्टर प्रवीण कहाळे यांनी सांगितले की, काम करताना काही काळ उभे राहणे फायदेशीर ठरू शकते. पण, दीर्घकाळ उभे राहणे हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी पुरेसे नाही. जर तुम्ही दोन तास बसणे आणि दोन तास उभे राहणे यांची तुलना केली, तर हृदयाच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून फरक कमी आहे. खरे फायदे चालणे, धावणे किंवा जॉगिंग यांसारख्या हालचालीतून मिळतात. (फोटो सौजन्य: @Freepik )

  • 10/10

    कामाच्या ठिकाणी हालचाल करा –
    केवळ उभं राहून काम करण्याच्या हालचालीवर अवलंबून राहण्याऐवजी, तुमच्या दैनंदिन दिनचर्येत नियमित हालचालींचा समावेश करणे हे शारीरिक, हृदय व रक्तवाहिन्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी महत्त्वाचे आहे. कामाच्या दरम्यान थोडे चालणे, स्ट्रेचिंग किंवा सिट-स्टँड सायकल वापरणेदेखील मदत करू शकते. कारण कामादरम्यान हालचाल केली की, रक्ताभिसरण सुधारते आणि मानसिक लक्ष, ऊर्जा वाढवण्यास मदत होते. त्यामुळे जास्त वेळ बसणे किंवा उभे राहणे याचे हानिकारक परिणाम कमी होतात. यामुळे तुम्हाला काम करताना अधिक ताजेतवाने तर लक्ष केंद्रित करण्याससुद्धा मदत होते. (फोटो सौजन्य: @Freepik )

TOPICS
हेल्थHealthहेल्थ टिप्सHealth Tipsहेल्थ न्यूजHealth Newsहेल्थ बेनिफीट्सHealth Benefits

Web Title: Standing for over two hours a day may increase the risk of developing health issues asp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.