-
मकरसंक्रांत हा वर्षाचा पहिला सण आहे. मकरसंक्रांत हा हिंदूंच्या प्रमुख सणांपैकी एक आहे, जो देशभरातील राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो. (फोटो सौजन्य:@Freepik)
-
‘तिळगूळ घ्या, गोड गोड बोला’, असे म्हणत तिळाचे लाडू देऊन मकरसंक्रांत आपल्याकडे साजरी केली जाते. मकरसंक्रांतीला गुळाची पोळी, चिक्की, तिळाचे लाडू असे अनेक गोड पदार्थ बनवले जातात.(फोटो सौजन्य:@Freepik)
-
तर यावर्षी तुम्हाला मकरसंक्रांतीला एखादा वेगळा पदार्थ करून पाहायचा असेल तर तुम्ही ‘भोपळा, तिळाच्या गोड घाऱ्या’ बनवून पाहू शकता. तर आज आपण हा पदार्थ कसा बनवायचा ते पाहू… (फोटो सौजन्य: @ASHACHIRASOI/ युट्युब)
-
भोपळा, तिळाच्या गोड घाऱ्या बनवण्यासाठी पाव किलो भोपळा, अर्धा किलो चण्याच्या डाळीचं पीठ, पाव किलो गूळ, वेलची पावडर, तीळ (५० किंवा १०० ग्रॅम), हळद, मीठ तेल इत्यादी साहित्य लागेल. (फोटो सौजन्य:@Freepik)
-
कृती : भोपळा धुवून घ्या आणि त्याचे साल काढून घ्या. गूळ बारीक करून आणि भोपळा किसून घ्या आणि दोन्ही कुकरमध्ये शिजवून घ्या.
(कुकरच्या एक किंवा दोन शिट्ट्या करून घ्या आणि कुकरमध्ये पाणी घालू नये).
(फोटो सौजन्य:@Freepik) -
नंतर चण्याच्या डाळीचं पीठ घेऊन त्यात हे मिश्रण आणि हळद, वेलची पावडर, चवीपुरतं मीठ घालून घ्या आणि मिक्स करा आणि पीठ मळून घ्या. (फोटो सौजन्य:@Freepik)
-
पीठ १५ ते २० मिनिटे किंवा अर्धा तास तसेच ठेवा. (टीप : पिठात अजिबात पाणी घालू नका). (फोटो सौजन्य:@KolhapuriKitchen/ युट्युब )
-
त्यानंतर हाताला पाणी लावून पीठ थापून पुरीसारखा आकार द्या आणि त्यावर तीळ लावून घ्या. नंतर कढईत तेल घ्या आणि या पुऱ्या तळून घ्या. (फोटो सौजन्य:@KolhapuriKitchen/ युट्युब )
-
अशाप्रकारे ‘भोपळ्याच्या तीळ लावलेल्या गोड घाऱ्या तयार’. तुम्ही या गोड घाऱ्या रव्याच्या किंवा तांदळाच्या खिरीबरोबर खाऊ शकता. (फोटो सौजन्य: @ASHACHIRASOI/ युट्युब) .
Makar Sankranti 2025: ‘भोपळा, तिळाच्या गोड घाऱ्या’ कधी खाल्ल्या आहेत का? मग यंदा मकरसंक्रातीला नक्की बनवा; वाचा सोपी रेसिपी
Bhoplyachya Gharya : यावर्षी तुम्हाला मकरसंक्रांतीला एखादा वेगळा पदार्थ करून पाहायचा असेल तर तुम्ही ‘भोपळा, तिळाच्या गोड घाऱ्या’ बनवू शकता…
Web Title: How to make makar sankranti special bhoplyache gharya recipe in marathi asp