• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. hair tips for grey white hair to black naturally at home in marathi diy white hair solutions sjr

Hair Tips : पांढरे केस काही दिवसांत दिसतील काळेभोर अन् लांबसडक; करुन पाहा फक्त ‘हे’ ९ नैसर्गिक उपाय

hair tips for grey white hair to black naturally at home : प्रत्येकजण पांढऱ्या केसांच्या समस्येने त्रस्त असतो. केस अकाली पांढरे होण्यापासून रोखण्यासाठी आणि पांढरे केस नैसर्गिकरित्या काळे करण्यासाठी नैसर्गिक उपाय जाणून घ्या.

January 25, 2025 07:45 IST
Follow Us
  • hair tips | white hair dye tips | natural hair dye tips at home | hair tips of gray hair to black naturally | black hair natural dye
    1/10

    पांढरे केस नैसर्गिकरित्या काळे करण्यासाठी टिप्स
    Hair Tips : पांढऱ्या केसांची समस्या आता सामान्य झाली आहे. यामुळे सर्वजण त्रस्त झाले आहेत. काळे केस पांढरे होण्यापासून थांबवण्यासाठी अनेक उपाय करुन पाहिले जातात. यासाठी बाजारातील हेअर ड्रायर आणून लावले जाते. पण त्यातील केमिकलमुळे केसांचे नुकसान होते.

  • 2/10

    कांदा अन् कडुलिंबाच्या पानांचा रस
    कांदा अन् कडुलिंबाच्या पानांचा रस
    मिसळून लावल्यास पांढऱ्या केसांची समस्या कमी होऊ शकते. यासाठी कडुलिंबाची पानं तेलात गरम करुन त्याचा रस काढा आणि तो कांद्याचा रस मिसळा. हे तेल केसांना लावून मसाज करा. यामुळे रक्त परिसंचरण वाढवते, केसांचे पोषण मिळचे आणि केसांची वाढ होते.

  • 3/10

    मेंदी अनं लिंबाचा रस
    मेंदीमुळेही केसांची वाढ चांगली होऊ शकते. यासाठी थोडी मेंदी घ्या आणि त्यात चहाच्या पानांचे पाणी घाला. आता त्यात लिंबाचा रस घाला. ही पेस्ट केसांना लावा. सुमारे ४० मिनिटांनंतर किंवा मेंदी सुकल्यावर केस थंड पाण्याने धुवा.

  • 4/10

    आवळा पाणी
    आवळ्याच्या पाण्यामुळे केस काळे होण्यास मदत होते. तुम्हाला फक्त आवळ्याचे पाणी घ्यायचे आहे आणि नंतर या पाण्यात थोडेसे पाणी घालून केसांना लावायचे आहे. ते कापसाच्या साहाय्याने अशा प्रकारे लावा की ते केसांच्या मुळांमध्ये पसरेल. त्यामुळे केस काळे होतील. खरं तर आवळ्याच्या पाण्याने कोलेजन वाढवतो आणि नंतर केसांचा पोत चांगला होतो. त्यामुळे केस मुळापासून काळे होतात.

  • 5/10

    काळे तीळ आणि मोहरीचे तेल
    तिळाच्या बियांमध्ये केस काळे करण्याचे गुणधर्म असतात आणि त्यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन बी असते, ज्यामुळे तुमचे केस काळे होण्यास मदत होते. हे अँटिऑक्सिडंट्स, लोह, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सारखी खनिजे आणि ए, डी, ई आणि के सारख्या जीवनसत्त्वे यांचा समृद्ध स्रोत आहे ज्यामुळे तुमच्या केसांचा पोत सुधारतो. यासाठी मोहरीच्या तेलात काळे तीळ मिसळून ते गरम करा नंतर केसांना लावा आणि हलक्या हाताने मसाज करा, यामुळे केस पांढरे होण्याची समस्या कमी होते.

  • 6/10

    बीटाचा रस
    वाढत्या वयामुळे केस पांढरे होण्याची समस्या झपाट्याने वाढते. तुम्ही बीटरूटचे सेवन केल्यास तुमच्या शरीरातील वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावते आणि केस पांढरे होण्याची समस्या कमी होते. याव्यतिरिक्त, त्यातील लोहामुळे राखाडी केस पुन्हा काळे करण्यास देखील मदत करू शकते, यामुळे केसांचा रंग आणि रचना सुधारते.

  • 7/10

    लवंगा आणि कॉफी
    लवंग आणि कॉफी हे दोन्ही हेअर पॅक तुमचे राखाडी केस काळे करण्यास मदत करू शकतात. लवंग पाण्यात उकळून पाणी गाळून घ्या. नंतर त्यात कॉफी पावडर टाका, आता ही पेस्ट केसांना लावा आणि थोडा वेळ तशीच राहू द्या. केस कोरडे झाल्यानंतर थंड पाण्याने केस धुवा.

  • 8/10

    आवळा आणि मेथी हेअर पॅक
    आवळा आणि मेथी हेअर पॅक लावल्याने अनेक फायदे होतात. सर्वप्रथम आवळा कापून पाण्यात उकळून पाणी गाळून घ्या. त्यात मेथी पावडर घाला. सर्वकाही व्यवस्थित मिसळल्यानंतर त्याची पेस्ट बनवा. आता ही पेस्ट केसांना लावा आणि किमान ३० मिनिटे राहू द्या. शेवटी, केस थंड पाण्याने धुवा. हे केसांची वाढ सुधारते.

  • 9/10

    आवळा ब्राह्मी आणि शिककाई तेल
    आवळा ब्राह्मी आणि शिककाई तेल केसांना सुंदर बनवण्यास मदत करते. आवळा, ब्राह्मी आणि शिककाई रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. सकाळी या पाण्याने केस धुवा. हा उपाय केल्याने केसांचा पोत सुधारतो, केसांचे अतिनील किरणांपासून संरक्षण होते आणि केस मुळापासून काळे राहतात. त्यामुळे या घरगुती उपायाने केस जास्त काळ काळे राहतात.

  • 10/10

    रोझमेरी अन् जास्वंदाचे तेल
    रोझमेरी वॉटर अन् जास्वंदाच्या तेलाने केसांचा पोत सुधारतो यामुळे केस जास्त काळ काळे राहू शकतात. तर तुम्हाला फक्त नारळ किंवा ऑलिव्ह ऑईल घ्या त्यात रोझमेरी वॉटर अन् जास्वंदाच्या तेल मिसळा आणि चांगले गरम करा. त्यानंतर हे तेल केसांना लावा. यामुळे केस पांढरे होण्याची समस्या कमी होते आणि केसांची वाढही सुधारते.(सर्व फोटो: फ्रीपिक)

TOPICS
चाणक्य नीती लाइफChanakya Nitiलाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle Newsहेल्दी लाइफस्टाइलHealthy Lifestyle

Web Title: Hair tips for grey white hair to black naturally at home in marathi diy white hair solutions sjr

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.