• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. what will happen to your body if you eat raw onions every day find out what expert opinion snk

तुम्ही रोज कच्चा कांदा खाल्ला तर तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात…

What happens to your body if you eat raw onions every day : रोज कच्चा कांदा खाल्याने शरीरावर काय परिणाम होतो? हे अतिप्रमाणात कांद्याचे सेवन करण्यासारखे आहे का?

February 12, 2025 14:13 IST
Follow Us
  • What happens to your body if you eat raw onions every day
    1/9

    ताजी काकडी, लाल टोमॅटो व गुलाबी कांदे टाकून तयार केलेले सॅलड किंवा कोशिंबीर खायला अनेकांना आवडते. ही कोशिंबीर आपल्या जेवणाची चव वाढवते. पण, तुम्ही कधी विचार केला आहे का की, जर तुम्ही नियमित कोशिंबीर किंवा सॅलड खात असाल, तर रोज कच्चा कांदा खाल्याने शरीरावर काय परिणाम होतो? हे अति प्रमाणात कांद्याचे सेवन करण्यासारखे आहे का? याबाबत दी इंडियन एक्स्प्रेसला आरोग्य विशेषज्ज्ञांनी माहिती दिली आहे.

  • 2/9

     “कांद्यात सल्फर संयुगे आणि क्वेर्सेटिन भरपूर प्रमाणात असतात, जे शरीरात ऑक्सिडेटिव्ह ताणाचा सामना करण्यास मदत करतात, आपल्या पेशींचे संरक्षण करतात आणि दाहकता (सूज येणे किंवा लालसरपणा येणे) कमी करतात.

  • 3/9

    कांद्यामधील सल्फर संयुगे हृदयाचे संरक्षणात्मक गुणधर्म आहेत, रक्तदाब नियंत्रित करतात आणि रक्त गोठण्यास प्रतिबंध करण्यास मदत करतात,” असे होलिस्टिक डाएटिशियन व्रीती श्रीवास्तव (Vriti Srivastav, holistic dietitian) यांनी सांगितले.

  • 4/9

    कांद्यामध्ये आढळणारे सल्फर संयुगे, क्वेर्सेटिन व खनिज क्रोमियम इन्सुलिन संवेदनशीलता सुधारतात आणि इन्सुलिन प्रतिरोध रोखतात किंवा नियंत्रित करतात, असे त्या म्हणाल्या.

  • 5/9

    “मी माझ्या मास्टर्सदरम्यान एका वसतिगृहात राहिले होते आणि मेसमध्ये लिंबू आणि कांदे हेच पदार्थ दिला जात असत. लिंबाचा रस व काळ्या मिरीसह कांदे खाणे हा माझ्यासाठी रोजचा दिनक्रम होता आणि माझी रोगप्रतिकारक शक्ती खूप चांगली होत असल्याचे मला दिसून आले. मला सतत सर्दी होणे बंद झाले. माझ्या रूममेट्सना खूप सर्दी आणि फ्लू होता; परंतु तरीही मला कधीही सर्दी झाली नाही याचे मला आश्चर्य वाटे” ,असेही श्रीवास्तव यांनी सांगितले.

  • 6/9

    त्या म्हणाल्या की, ज्यांची पचनक्रिया चांगली आहे त्यांच्यासाठी कांदे हा एक उत्तम आहार आहे. कारण कांदा आतड्यांमधील चांगल्या बॅक्टेरियांसाठीही योग्य आहार आहे. कारण- त्यात फायबरचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे आतड्यांचे एकूण आरोग्य सुधारते आणि निरोगी आतडे ही निरोगी शरीराची गरज आहे.

  • 7/9

    दररोज कच्चा कांदा खाण्याशी संबंधित आरोग्य धोके (Health risks associated with eating raw onions daily)
    “कांद्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत; परंतु ज्यांना अन्न नीट पचत नाही अशा काही लोकांना कांद्याच्या सेवनामुळे काही पचनाच्या समस्या होऊ शकतात.

  • 8/9

    कमी आम्ल पातळी (low acid levels), अॅसिड रिफ्लक्स किंवा आयबीएस यांसारख्या आतड्यांसंबंधीची समस्या असलेल्या लोकांमध्ये कांदा खाण्यामुळे पोटफुगी, गॅस किंवा छातीत जळजळ होऊ शकते. अशा परिस्थितीत कच्चा कांदा टाळावा,” असे श्रीवास्तव यांनी स्पष्ट केले.

  • 9/9

    त्यांनी असेही सांगितले, “कांद्यामध्ये रक्त पातळ करण्याचे गुणधर्म असतात आणि त्यामुळे ते रक्ताच्या गुठळ्या रोखण्यासाठी फायदेशीर ठरतात. पण, रक्त पातळ करणारी औषधे घेणार्‍यांनी कोणत्याही औषधांशी प्रक्रिया होऊ नये यासाठी आपल्या आहारतज्ज्ञ व डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरेल.”

TOPICS
फूडFoodमराठी बातम्याMarathi Newsलाइफस्टाइलLifestyleहेल्दी फूडHealthy Foodहेल्दी लाइफस्टाइलHealthy Lifestyle

Web Title: What will happen to your body if you eat raw onions every day find out what expert opinion snk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.