-
यंदा २६ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री साजरी केली जाईल. या दिवशी महादेवाची पूजा-आराधना तसेच व्रत केल्याने इच्छित वराची प्राप्ती होते. तसेच अनेक भाविक या दिवशी शिवमंदिरात जातात. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
महादेवांच्या आराधनेसह दान-धर्म करणं देखील शुभ मानले जाते. त्यामुळे या दिवशी महादेवाला प्रिय वस्तू अवश्य अर्पण कराव्या. (फोटो सौजन्य: Freepik)
-
महादेवांना पांढऱ्या वस्तू अत्यंत प्रिय आहेत. ज्योतिष शास्त्रात दूध, दही, साखर, तांदूळ या पांढऱ्या वस्तूंना चंद्राशी संबंधित मानले जाते. चंद्र ग्रह महादेवांच्या मस्तकावर विराजमान आहे. त्यामुळे तो महादेवांना अत्यंत प्रिय आहे. (फोटो सौजन्य: Freepik)
-
त्यामुळे दर सोमवारी, श्रावण महिन्यात तसेच महाशिवरात्रीच्या दिवशी चंद्राशी संबंधित या पांढर्या वस्तूंचा शिवलिंगावर अभिषेक केल्यास महादेव प्रसन्न होऊन भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. (फोटो सौजन्य: Freepik)
-
महाशिवरात्रीला कच्च्या दुधाने शिवपिंडीवर अभिषेक केल्याने घरातील कलह दूर होतात. कुटुंबात शांतता नांदते. मानसिक तणाव दूर होतो. असे म्हटले जाते. (फोटो सौजन्य: Freepik)
-
महाशिवरात्रीला शिवपिंडीवर दह्याचे दान केल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर होतात. अपूर्ण कामे पूर्ण होतील. आयुष्यात सुख समृद्धी येईल. (फोटो सौजन्य: Freepik)
-
महाशिवरात्रीला शिवपिंडीवर साखर अर्पण केल्याने बुद्धी, एकाग्रता वाढते. तसेच यामुळे आयुष्यात गोडवा निर्माण होतो. (फोटो सौजन्य: Freepik)
-
महाशिवरात्रीला अक्षता अर्पण केल्याने आर्थिक परिस्थिती सुधारते. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहते. असे म्हटले जाते. (फोटो सौजन्य: Freepik)
-
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
Mahashivratri 2025 : महाशिवरात्रीला शिवलिंगावर ‘ही’ एक वस्तू अर्पण केल्याने आयुष्यात सुख-समृद्धी, पैसा अन् एकग्रता वाढेल
Mahashivratri 2025: महादेवांच्या आराधनेसह दान-धर्म करणं देखील शुभ मानले जाते. त्यामुळे या दिवशी महादेवाला प्रिय वस्तू अवश्य अर्पण कराव्या.
Web Title: Mahashivratri 25 by offering an this thing on shivlinga to mahashivratri happiness money will increase in life sap