• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. bollywood actress kareena kapoors nutritionist rujuta diwekar told essential foods for women in 40s ndj

करीना कपूरच्या न्युट्रिशनिस्ट सांगितले चाळिशीतल्या महिलांनी कोणते पदार्थ खावेत?

Best Foods for Women’s Health : न्युट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर सांगतात की, दररोजच्या धावपळीच्या आयुष्यात अनेकदा महिलांना नाश्ता बनवायला वेळ मिळत नाही, अशावेळी स्त्रियांना सहज बनवता येईल असे सोपे आणि आवश्यक अन्नपदार्थांचे त्यांनी पर्याय सांगितले आहेत. जाणून घेऊ या.

February 24, 2025 23:14 IST
Follow Us
  • best diet for women over 40
    1/9

    करीना कपूर खानची न्युट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर या सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. त्या नेहमी आहाराविषयी नवनवीन माहिती सांगतात. (Photo : Instagram)

  • 2/9

    एका व्हिडीओमध्ये त्यांनी पेरी-मेनोपॉजल आणि मेनोपॉजल महिलांसाठी पौष्टिक अन्नपदार्थांचे पर्याय सांगितले आहेत. मेनोपॉज येण्यापूर्वीचा टप्पा म्हणजे पेरी मेनोपॉज. यामध्ये मासिक पाळी अनियमित होते, मात्र पूर्ण बंद होत नाही आणि मेनोपॉज म्हणजे मासिक पाळी पूर्णपणे बंद होणे. (Photo : Instagram)

  • 3/9

    न्युट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर सांगतात की, दररोजच्या धावपळीच्या आयुष्यात अनेकदा महिलांना नाश्ता बनवायला वेळ मिळत नाही, अशावेळी स्त्रियांना सहज बनवता येईल असे सोपे आणि आवश्यक अन्नपदार्थांचे त्यांनी पर्याय सांगितले आहेत. जाणून घेऊ या. (Photo : Instagram)

  • 4/9

    ऋजुता यांनी त्यांच्या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “विशेषत: पेरी मेनोपॉजल आणि मेनोपॉजल महिलांसाठी उत्तम खाद्यपदार्थ” (Photo : Instagram)

  • 5/9

    ऋजुता दिवेकर यांनी नाश्त्याचे महत्त्व सांगितले आणि नाश्त्याला दिवसातील सर्वात महत्त्वाचे जेवण म्हटले. ऋजुता या नियमित नाश्ता करण्याचा सल्ला देतात आणि कोणतेही ब्लेंडर किंवा मिक्सर न वापरता घरी कढई, तव्यावर बनवता येईल असा साधा नाश्ता करण्यास सांगतात. (Photo : Instagram)

  • 6/9

    त्या पुढे काय खावे याबाबत मजेशीरपणे व्हिडीओमध्ये म्हणतात, “माझ्याकडे बघू नका; तुमच्या स्वयंपाकघरात बघा. तुम्हाला काय खायचे आहे ते तुम्हालाच समजेल.” (Photo : Instagram)

  • 7/9

    तुमच्या नाश्त्यामध्ये मूठभर शेंगदाणे खा
    ऋजुता यांनी चेहरा, केस, पोट आणि संपूर्ण आरोग्यासाठी शेंगदाणे खाण्याचा सल्ला दिला आहे. त्या सांगतात, “चहा किंवा कॉफीबरोबर मूठभर शेंगदाणे खा, यामुळे तुमची चिडचिड कमी होईल, जे मेनोपॉजच्या प्रमुख लक्षणांपैकी एक आहे.” (Photo : Instagram)

  • 8/9

    त्या पुढे सांगतात, “आयुष्यात गोडवा आणण्यासाठी तुम्हाला थोडासा कुरकुरीतपणा आवश्यक असतो. पौष्टिक नाश्ता घेतल्याने सकारात्मक ऊर्जेचा अनुभव घेता येतो. तुम्हाला वाटेल की तुमचा नवरा इतकाही वाईट नाही किंवा मुले इतकी पण आळशी नाही. एवढंच काय, तर तुम्हाला वाटेल की तुम्ही इतकेपण लठ्ठ नाही.” (Photo : Instagram)

  • 9/9

    शेवटी ऋजुता यांनी रात्रीच्या झोपेचे महत्त्व सांगितले. रात्रीच्या शांत झोपेसाठी त्यांनी जेवणात भात, घरगुती ताक आणि कडधान्ये जसे की मूग, चवळी, चणे इत्यादी एकत्र करून जेवण करण्याचा सल्ला दिला आहे. हे तीन पदार्थ मेनोपॉजल महिलांना त्यांचे हार्मोनल बदल तसेच गॅसेसच्या समस्येचे व्यवस्थापन करण्यास मदत करतात. (Photo : Instagram)

TOPICS
करीना कपूरKareena Kapoorकरीना कपूर खानKareena Kapoor Khanलाइफस्टाइलLifestyleहेल्दी लाइफस्टाइलHealthy Lifestyle

Web Title: Bollywood actress kareena kapoors nutritionist rujuta diwekar told essential foods for women in 40s ndj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.