-
ज्योतिषशास्त्रानुसार अनेकदा एका राशीत दोन किंवा त्याहून अधिक ग्रहांची युती निर्माण झाल्याने शुभ किंवा अशुभ संयोग निर्माण होतो. या संयोगाचा शुभ किंवा अशुभ प्रभाव मानवी जीवनावर पडतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
येत्या काळात सहा ग्रह एकत्र युती निर्माण करत आहेत. राहू आणि शुक्र मार्चमध्ये मीन राशीतच असून आता चंद्र २८ मार्च रोजी मीन राशीत प्रवेश करणार आहे आणि २९ मार्च रोजी शनीदेखील या राशीत प्रवेश करणार आहे. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
तसेच फेब्रुवारीमध्ये बुध ग्रह मीन राशीत प्रवेश केला होता आणि १४ मार्च रोजी सूर्याने देखील मीन राशीत प्रवेश केला. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
त्यामुळे या सहा ग्रहांच्या मीन राशीत एकत्र येण्याने काही राशींना त्याचा चांगला फायदा होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
षडग्रही योग सिंह राशीच्या व्यक्तींसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात नोकरीत हवे तसे यश मिळवाल. आत्मविश्वासात वाढ होईल. मनातील सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील. या काळात आई-वडील आणि तुमच्या गुरूंचा आर्शीवाद तुमच्या पाठीशी असेल.(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
मकर राशीच्या व्यक्तींसाठीही मीन राशीतील सहा ग्रहांची युती अत्यंत सकारात्मक सिद्ध होईल. त्यामुळे अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. आकस्मिक धनलाभ होईल. मनातील सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
धनु राशीच्या व्यक्तींसाठी मीन राशीतील सहा ग्रहांची युती खूप फायदेशीर ठरेल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा सहज पूर्ण होतील. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नोकरी मिळण्याचे योग आहेत. व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
मीन राशीतील सहा ग्रहांची युती ‘या’ तीन राशींना देणार व्यवसायात प्रगती आणि अचानक धनलाभ
Shadgrahi Yog In Meen Rashi: या सहा ग्रहांच्या मीन राशीत एकत्र येण्याने काही राशींना त्याचा चांगला फायदा होईल.
Web Title: Shadgrahi yog in meen rashi three zodiac signs and progress in the business and suddenly wealth sap