-
काळी ऑफिसला डब्यात कोणी भाजी घेऊन जायची असा प्रश्न आपल्यातील अनेकांना पडलेला असतो. भेंडी, कोबी, मसूर, बटाटा अशा नेहमीच्या भाज्या डब्याला घेऊन जायला आणि खायला आपल्यातील अनेकांनाच कंटाळा येतो. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
तर आज अगदी काही मिनिटांत होणारी मसालेदार भाजीची रेसिपी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. शेवग्याची शेंग आमटीत दिसली की, अनेकांना रहावत नाही, अगदी तोंडाला पाणी सुटते आणि कधी खातो असे होऊन जाते. तर आज आपण चटपटीत, शेवग्याच्या शेंगाची भाजी कशी बनवायची हे पाहणार आहोत. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवण्यासाठी ४ शेवग्याच्या शेंगा, राई-जिरं-कडीपत्ता, मसाला, मिठ, हळद, वाटीभर खोबरं, खसखस, लसूण, टोमॅटो, तीळ, आलं इत्यादी साहित्य लागेल. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
४ शेवग्याच्या शेंगा मार्केटमधून आणा. शेंगा तुम्ही कुकरला २ शिट्या देऊन किंवा तुम्ही पाण्यात सुद्धा उकळवून घेऊ शकता. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
त्यानंतर दुसरीकडे वाटीभर खोबरं, तीळ, खसखस, लसूण, आलं, टोमॅटो मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
नंतर गॅसवर टोप ठेवा, त्याच्यात तेल ओता.राई-जिरं-कडीपत्ताची फोडणी द्या. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
नंतर त्यात मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं वाटण घाला.मसाला, मिठ, हळद घालून हलवून घ्या. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
नंतर चांगल भाजून घेतलेल्यावर त्यात शेंगा टाका.थोडं हलवून घ्या आणि पाणी घाला. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
अशाप्रकारे शेवग्याच्या शेंगाची भाजी तयार. (फोटो सौजन्य: युट्युब / @deepskitchenmarathi / स्क्रिनशॉट)
Shevgyachya Shengachi Bhaji: फक्त १५ मिनिटांत बनवा शेवग्याच्या शेंगाची भाजी; ऑफिसच्या डब्यासाठी टेस्टी रेसिपी
Shevgyachya Shengachi Bhaji Recipe: आज आपण चटपटीत, शेवग्याच्या शेंगाची भाजी कशी बनवायची हे पाहणार आहोत.
Web Title: How to make shevgyachya shengachi bhaji read recipe and try ones at your home asp