-
ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन होतो. ज्याचा १२ राशीच्या व्यक्तींवर विविध परिणाम पाहायला मिळेल. नवग्रहात शनीला खूप महत्वपूर्ण ग्रह मानले जाते. शनीला कर्मफळदाता आणि न्यायप्रिय देवता देखील म्हटलं जातं. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
शनी नेहमीच चांगले कर्म करणाऱ्या व्यक्तीना शुभ फळ प्रदान करतो. तर इतरांना विणाकारण त्रास देणाऱ्या आणि वाईट कर्म करणाऱ्यांवर शनीचा नकारात्मक प्रभाव पडतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
शनी सर्वात मंद गतीने चालणारा ग्रह आहे; त्यामुळे त्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्यासाठी अडीच वर्षाचा कालवधी लागतो. तसेच वेळोवेळी तो नक्षत्र परिवर्तनही करतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
पंचांगानुसार, सध्या शनी मीन राशीत विराजमान असून २०२७ पर्यंत तो या राशीत राहील. ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीतील ४,७,१० आणि ३ त्रिकोण भाव १,५,९ जेव्हा आपापसात दृष्टि संबंध किंवा राशी परिवर्तन करतात, तेव्हा केंद्र त्रिकोण योग निर्माण होतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
शनीचा केंद्र त्रिकोण राजयोग तूळ राशीच्या व्यक्तींना खूप लाभदायी ठरेल. या राशीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक स्पर्धेत यश मिळेल. यावेळी तुमचे व्यक्तिमत्त्व सुधारेल. या काळात तुम्हाला प्रत्येक कामात हवे तसे यश मिळेल. आरोग्य चांगले राहील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
मकर राशीच्या व्यक्तींना शनीचा केंद्र त्रिकोण राजयोग प्रवेश खूप सकारात्मक फळ देणारा ठरणार आहे. या काळात भाग्याची पूरेपूर साथ मिळेल. उत्पन्नाचे नवे मार्ग सापडतील. आर्थिक बाजू भक्कम होईल. या काळात तुमच्या आयुष्यात आनंदी आनंद येईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
वृश्चिक राशीच्या व्यक्तींना शनीचा केंद्र त्रिकोण योग अत्यंत लाभदायी ठरेल. या काळात नव्या कामाची सुरुवात होईल. कामातील अडथळे दूर होतील. या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील. मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
‘या’ तीन राशीच्या व्यक्ती पैसा, प्रेम अन् प्रतिष्ठा कमावणार, शनी निर्माण करणार केंद्र त्रिकोण राजयोग
Kendra Trikona Rajyog: शनी मिथुन राशीमध्ये त्रिकोण आणि भाग्य भावाचा स्वामी होऊन केंद्र भावात गोचर करत आहे. ज्यामुळे केंद्र त्रिकोण राजयोग निर्माण होईल. हा योग काही राशीच्या व्यक्तींसाठी फायदेशीर ठरेल.
Web Title: Shani make kendra trikon rajyog these three zodic get money and happiness sap