-
हिंदू धर्म शास्त्रानुसार चातुर्मास प्रारंभ झाल्यावर (म्हणजेच आषाढ शुद्ध एकादशीनंतर) येणारा पहिला मास हा श्रावण (Shravan) मास होय. (Photo Credit: Pexels)
-
रूढी परंपरेनुसार या मासापासून व्रत वैकल्ये सुरू होतात. या मासाला पवित्र मास म्हणतात, अशी माहिती सनातन संस्थेच्या विभा चौधरी यांनी दिली.
-
पवित्र मासात श्रावणी सोमवार, नागपंचमी, मंगळागौर पूजन, गोकुळाष्टमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, शुक्रवारचे व्रत अशी अनेक व्रते केली जातात. या महिन्यातील प्रत्येक सोमवारी ‘श्रावणी सोमवार’ हे व्रत केले जाते.
-
या वर्षीच्या श्रावण महिन्यामध्ये श्रावण सोमवारचे व्रत २८ जुलै, ४, ११, १८ ऑगस्ट (Shravani Somvar) या दिवशी असणार आहे.
-
श्रावण महिन्यातील दर सोमवारी शंकराच्या देवळात जाऊन त्याची पूजा आणि निराहार उपवास किंवा नक्त व्रत करण्याची प्रथा आहे.
-
श्रावण मासातील सोमवारी शिवाच्या मंदिरात जाऊन शिवपिंडीला अभिषेक घालणे, पूजा करणे, शिवामूठ वाहणे अशा प्रकारे हे व्रत केले जाते.
-
सोमवार व्यतिरिक्त अन्य व्रते धर्माने सांगितल्या प्रमाणे आणि रूढी परंपरेनुसार सुरू असतात. या पवित्र श्रावण महिन्यातील व्रते भक्ती भावाने केली जातात.
-
आपल्या घरातील शिवलिंगाची पूजा करावी. शिवलिंग उपलब्ध नसेल, तर शिवाच्या चित्राची पूजा करावी.
-
शिवाच्या चित्रसुद्धा उपलब्ध नसेल, तर पाटावर शिवलिंगाचे किंवा शिवाचे चित्र काढून त्याची पूजा करावी.
-
‘ॐ नमः शिवाय ।’ हा नाममंत्र लिहूनही त्याची आपण पूजा करू शकतो.
-
पूजा करताना शिवाला पांढरे फुल वाहू शकतो. त्रिदल बेल वहावा. शिवाला अर्ध प्रदक्षिणा घालावी.
-
विवाहानंतर पहिली पाच वर्षे श्रावण सोमवारी शिवामूठ व्रत केले जाते. श्रावण मासात येणार्या चार सोमवारी चार प्रकारचे धान्य शिवाला अर्पण केले जाते, असे सनातन संस्थेच्या विभा चौधरी यांनी सांगितले.
Shravan 2025: श्रावण महिन्यात घरी अशा प्रकारे करा महादेवाची पूजा; शिवामूठ व्रत कसे करावे? जाणून घ्या…
या वर्षीच्या श्रावण महिन्यामध्ये श्रावण सोमवारचे व्रत २८ जुलै, ४, ११, १८ ऑगस्ट या दिवशी असणार आहे.
Web Title: Shravan 2025 lord shankar shiva pooja vidhi shivamuth shravani somvar dates mantra in marathi photos sdn