-
हृदयविकार म्हटलं की बहुतेकदा आपण छातीत दुखणं आणि डाव्या हातात वेदना अशी लक्षणं ऐकतो. मात्र, महिलांमध्ये ही लक्षणं वेगळी असतात आणि त्यामुळे अनेकदा त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. महिलांमधील हृदयविकार समजून घेण्यासाठी खाली आठ महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत. (फोटो सौजन्य : FreePik)
-
छातीच्या दुखण्याऐवजी थकवा, मळमळ पुरुषांमध्ये छातीत दुखणं हे मुख्य लक्षण असतं. पण, महिलांमध्ये थकवा, मळमळ, श्वास घेण्यास त्रास अशी सौम्य वाटणारी लक्षणं दिसतात. (फोटो सौजन्य : FreePik)
-
जबड्यात, पाठीवर किंवा गळ्यात वेदना छातीऐवजी पाठीवर, जबड्यात किंवा गळ्याच्या भागात वेदना जाणवणं हे महिलांमध्ये हृदयविकाराचं लक्षण असू शकतं. (फोटो सौजन्य : FreePik)
-
हार्मोनल फरक महिलांमध्ये इस्ट्रोजेनसारखे हार्मोन्स असतात, जे रजोनिवृत्तीपूर्वी हृदयाचं संरक्षण करतात. पण, नंतर हा नैसर्गिक बचाव कमी होतो. (फोटो सौजन्य : FreePik)
-
सूक्ष्म रक्तवाहिन्यांवर परिणाम महिलांमध्ये हृदयाच्या सूक्ष्म रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा येतो, त्यामुळे ECG किंवा अँजिओग्राफीमध्ये अचूक निदान होऊ शकत नाही. (फोटो सौजन्य : FreePik)
-
भावनिक ताणाचा अधिक प्रभाव महिलांना ताणतणावाचा परिणाम अधिक होतो. चिंता, नैराश्य आणि मानसिक थकवा याचा थेट परिणाम हृदयावर होतो. (फोटो सौजन्य : FreePik)
-
चुकीचं निदान होण्याची शक्यता लक्षणं वेगळी असल्यामुळे डॉक्टरही कधी कधी याकडे गॅस्ट्रिक, थकवा किंवा ॲसिडिटी म्हणून पाहतात, त्यामुळे वेळेवर उपचार मिळत नाहीत. (फोटो सौजन्य : FreePik)
-
वयाचं भान न ठेवणं हृदयविकार फक्त वृद्ध महिलांनाच होतो असं अनेकांना वाटतं, पण मध्यमवयीन महिलांनाही याचा धोका असतो, तो लक्षात घेतला जात नाही. (फोटो सौजन्य : FreePik)
-
स्वतःकडे दुर्लक्ष करणं घर, कुटुंब, काम यामुळे अनेक महिला स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करतात. लक्षणं असूनही तपासणी टाळली जाते. (फोटो सौजन्य : FreePik)
महिलांमध्ये हृदयविकाराची लक्षणं पुरुषांपेक्षा वेगळी का दिसतात? जाणून घ्या कारणं
Heart attack symptoms: महिलांमध्ये हृदयविकाराची लक्षणं सौम्य आणि वेगळी असतात, त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता जास्त असते. वेळेवर ओळखणं महत्त्वाचं!
Web Title: Heart attack symptoms in women vs men differences early warning signs health tips svk 05