-
आपल्याकडे बऱ्याचदा लोक सकाळी चहाबकरोबर बिस्किटे खातात. बिस्किटे खाणं तुम्हाला योग्य वाटू शकतं, परंतु आरोग्य तज्ञांच्या मते, ते तुमच्यासाठी धोकादायकही ठरू शकते. (Photo: Meta AI)
-
त्यात रिफाइंड साखर आणि हायड्रोजनेटेड तेल देखील असते जे आरोग्याला हानी पोहोचवते. बिस्किटे खाल्ल्याने अनेक गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात, चला याबद्दल जाणून घेऊयात… (Photo: Meta AI)
-
बिस्किटे खाण्याचे हानिकारक परिणाम
रक्तातील साखर वाढ
बिस्किटांमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो. जर तुम्ही दररोज सकाळी चहासोबत बिस्किटे खाल्ली तर तुमच्या रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढू शकते. (Photo: Pexels) -
रोगप्रतिकारक शक्ती घटते
बिस्किटांमध्ये प्रथिने, फायबर आणि जीवनसत्त्वे खूप कमी असतात. जर मुले ते दररोज खात असतील तर त्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. (Photo: Meta AI) -
शारीरिक विकासावर परिणाम होतो आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. (Photo: Meta AI)
-
लठ्ठपणा येऊ शकतो
बिस्किटांमध्ये रिफाइंड पीठ असते. त्यात कॅलरीज आणि साखर असते ज्यामुळे चरबी वाढते. चरबी जमा झाल्यामुळे लठ्ठपणा येऊ शकतो. जर तुमचे वजन आधीच जास्त असेल तर बिस्किटे खाऊ नका. (Photo: Meta AI) -
याशिवाय, बिस्किटे खाण्याचे अनेक तोटे आहेत. उर्जेची पातळीही बिघडते. बिस्किटे खाल्ल्याने त्वरित ऊर्जा मिळते परंतु ही ऊर्जा लवकर संपते. (Photo: Pexels)
-
याशिवाय बिस्किटांमध्ये ट्रान्स फॅट आणि सॅच्युरेटेड फॅट असते ज्यामुळे हृदयरोग होऊ शकतो . यामुळे वाईट कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढू शकते. (Photo: Pexels)
-
(Photo: Pexels) हेही पाहा- आता UPI व्यवहारांवर लागणार शुल्क? आरबीआय गव्हर्नरांनी दिले संकेत; १ ऑगस्टपासून दोन महत्वाचे बदल…
Tea with biscuits : चहाबरोबर बिस्किटे खाणे आरोग्यासाठी ठरते हानिकारक; त्याचे तोटे जाणून घ्या…
आपल्यापैकी अनेक लोकांना सकाळी चहाबरोबर बिस्किटे खायला आवडतात पण तुम्हाला माहिती आहे का की बिस्किटे खाणे आरोग्यासाठी हानिकारक असू शकते.
Web Title: Side effects of eating biscuits with morning tea increase weight blood sugar know in marathi spl