-
टीव्ही शो होस्ट आणि अभिनेत्री मिनी माथूर नेहमीच मुलींच्या, महिलांवर प्रश्नांवर बोलते. महिलांच्या आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या तिच्या अलिकडच्या उपक्रमाचा एक भाग म्हणून, तिने ४३ व्या वर्षी शिकलेल्या काही धड्यांचा उल्लेख केला. “४३ व्या वर्षी नव्हे तर १८ व्या वर्षी मला सौंदर्याबद्दल माहिती असायला हवी होती. आयुष्यातील बहुतेक गोष्टींप्रमाणेच त्वचेची सातत्यपूर्ण काळजी गरजेची असल्याचं मत तिने नोंदवलं. (Photo: Pausitive/Instagram)
-
तिने इन्स्टावर एक पोस्ट केली आहे. यामध्ये तिने म्हटलंय की “मला १८ व्या वर्षी समजलं असतं की वेगवेगळ्या दिखाऊ पद्धतींपेक्षा नियमितपणा (consistency) महत्वाचा आहे, तर बरं झालं असतं.आपण हे आपल्या मुलींना सांगू शकतो, म्हणजे त्यांना आधीपासूनच समजेल.कारण अजूनही उशीर झालेला नाही. आणि आत्ताच्या काळात स्वतःची काळजी (self-care) घेणं पूर्वीपेक्षा जास्त महत्त्वाचं आहे. (Photo: Getty Images/Thinkstock)
-
दररोज रात्री तुमचा चेहरा स्वच्छ करा. मला माहित आहे की पहाटेचे २ वाजले आहेत आणि तुम्ही पार्टीवरून परत आला आहात आणि तुम्ही थकलेले आहात किंवा ओटीटी पाहत आहात किंवा वाचन करतत आहात.. पण उठून चेहरा धुवा. रात्री चेहरा स्वच्छ करणे गरजेचं आहे. असं सल्लागार आहारतज्ज्ञ कनिका मल्होत्रा म्हणाल्या. घाण, तेल, मेकअप आणि प्रदूषण काढून टाकल्याने चेहरा तजेलदार होतो. त्वचेची काळजी म्हणजे केवळ बाह्य स्वच्छता नाही. योग्य आहार, तणाव कमी करणं, पुरेशी झोप घेणं गरजेचं आहे. चेहऱ्यावरची घाण, तेलकटपणा, मेकअपचे अंश आणि बाहेरच्या वातावरणातील प्रदूषक नीट काढून टाकले नाहीत, तर छिद्रे (pores) बंद होतात आणि त्यामुळे त्वचेला त्रास होतो. आपल्या आहारामुळे, तणावामुळे, कमी झोपेमुळे, जास्त साखर खाल्ल्यामुळे शरीरात “systemic inflammation” म्हणजे सूज/जळजळ होते. यामुळे पिंपल्स, त्वचेची निस्तेजता आणि अकाली वृद्धत्व (premature ageing) येऊ शकतं. त्यामुळे त्वचा निरोगी ठेवण्यासाठी अँटिऑक्सिडंट्सयुक्त पदार्थ (बेरीस, पालकासारख्या पालेभाज्या) खा. ओमेगा-३ फॅटी ऍसिड्स (अक्रोड, जवस, मासे) खा. जास्त रिफाइन्ड साखर टाळा, कारण ती glycation (त्वचेची लवचिकता कमी करणारी प्रक्रिया) वाढवते आणि पिंपल्सची शक्यता वाढवते. (Photo: Getty Images/Thinkstock via Indian Express)
-
मोठी बाटली असलेला मॉइश्चरायझर वापरा. चेहऱ्याला न धुता रात्री झोपणं ही खूप चुकीची कल्पना आहे. रात्री झोपेत त्वचेतून ओलावा कमी होतो; त्यामुळे हायड्रेट करणं त्वचेच्या बॅरिअर रिपेअरसाठी मदत करतं. पण, मल्होत्रा यांनी हे अधोरेखित केलं की इंटर्नल हायड्रेशन आणि पोषक तत्त्वांचं सेवन (व्हिटॅमिन C, झिंक, प्रोटीन, आवश्यक फॅट्स) हे त्वचेची लवचिकता टिकवण्यासाठी अधिक महत्त्वाचं आहे. त्यांनी सांगितलं की काकडी, टरबूज आणि सुकामेवा यांसारखे हायड्रेटिंग पदार्थ आहारात घ्या, कारण ते त्वचेतील नैसर्गिक तेलांची भरपाई करतात. (Photo: Getty Images/Thinkstock via Indian Express)
-
तुमचे केस जास्त वेळा ब्लीच आणि कलर करू नका. मला माहित आहे की ते छान दिसतात पण त्यामुळे तुमच्या केसांची गुणवत्ता आणि चमक नष्ट होते, असं मिनी माथुर म्हणाले. केसांचे आरोग्य पोषणाशी जोडलेले आहे – कमी प्रथिने, लोहाची कमतरता आणि अपुरे बी जीवनसत्त्वे यामुळे चमक कमी होते आणि केस पातळ होतात,” (Photo: Getty Images/Thinkstock via Indian Express)
-
फळ खाताना फळांच्या साली त्वचेवर घासून घ्या. त्यात भरपूर स्किनकेअर आहे. मल्होत्रांच्या मते, फळांच्या सालींमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि सौम्य एक्सफोलिएंट्स (एएचए, व्हिटॅमिन सी) असतात, परंतु काळजीपूर्वक न वापरल्यास ते त्रासदायक ठरू शकतात. (Photo: Pixabay)
-
पाणी पिणं विसरू नका. हायड्रेशनमुळे पेशींचं कार्य व्यवस्थित होतं आणि त्वचा तजेलदार व टवटवीत दिसते, असं मल्होत्रा यांनी सांगितलं. पण, एक मर्यादा ओलांडल्यानंतर (उदा. दिवसाला ३-४ लिटरपेक्षा जास्त पाणी, तेही वैद्यकीय गरज नसताना) जास्त पाणी पिण्याने त्वचेला ‘अधिक तेज’ मिळत नाही. कारण शरीरातील पाण्याचा समतोल इलेक्ट्रोलाइट्सवरही अवलंबून असतो. मल्होत्रा यांनी पुढे सांगितलं की, योग्य प्रमाणात पाणी + संतुलित इलेक्ट्रोलाइट्स (केळीतील पोटॅशियम, सुका मेव्यातील मॅग्नेशियम) यामुळे त्वचा निरोगी राहते आणि ऊर्जा टिकून राहते. (Photo: Getty Images/Thinkstock via Indian Express)
-
तुम्ही स्वतःबद्दल नकारात्मक विचार करू नका. तुमचं शरीर सगळं ऐकत असतं. तुम्ही इतरांना तुमच्याबद्दल काय विचार करायला लावता यावर सगळं अवलंबून आहे. आत्मविश्वास आणि आरोग्य याहून सुंदर काहीच नाही, असं मिनी माथूर म्हणाली. (Photo: Freepik)
-
मिनीच्या वक्तव्याला अनुमोदन देत मल्होत्रा म्हणाल्या, “सततचा ताण (chronic stress) शरीरातील कॉर्टिसोलचं प्रमाण वाढवतो, ज्यामुळे त्वचेचं वृद्धत्व जलद होतं, पिंपल्स वाढतात आणि वजनावरही परिणाम होतो. योगा, माइंडफुलनेस (एकाग्रतेचे सराव) आणि रक्तातील साखरेचं संतुलन राखणं (प्रोटीन व फायबरयुक्त आहार घेणं) या गोष्टींमुळे ताणाचा त्वचा व केसांवर होणारा परिणाम थेट कमी करता येतो.” (Photo: Freepik)
“सौंदर्याबद्दल ४३ व्या वर्षी शिकले ते १८ व्या वर्षी माहिती असायला हवं होतं”, मिनी माथूरचा तरुणींना महत्त्वाचा सल्ला
मिनी माथूरने म्हटलंय की “मला १८ व्या वर्षी समजलं असतं की वेगवेगळ्या दिखाऊ पद्धतींपेक्षा नियमितपणा (consistency) महत्वाचा आहे, तर बरं झालं असतं.
Web Title: Mini mathur self care lessons skincare tips to girls iehd import asc