-
Stomach cancer symptoms: कॅन्सर अर्थात कर्करोग हा जीवघेणा आजार मानला जातो. कॅन्सरचे अनेक प्रकार आहेत. कॅन्सरला बदलती जीवनशैली, व्यसनं, व्यायामाचा अभाव, आनुवंशिकता आदी गोष्टी कारणीभूत ठरू शकतात, असं तज्ज्ञ सांगतात. कॅन्सरची काही लक्षणं सुरुवातीच्या टप्प्यात शरीरात दिसू लागतात. (PHOTO: Freepik)
-
कर्करोगाचे निदान होण्यापूर्वी लोकांना विविध लक्षणे जाणवतात का? दिल्लीतील सी. के. बिर्ला हॉस्पिटलमधील जीआय ऑन्कोलॉजी, जीआय आणि एचपीबी सर्जरीचे ऑन्कोलॉजी सर्व्हिसेसचे संचालक डॉ. नीरज गोयल म्हणाले की, कर्करोग बहुतेकदा शांतपणे पसरतो; परंतु काही लक्षणे निदानापूर्वी समजू शकतात. (PHOTO: Freepik)
-
“कर्करोगाच्या सामान्य लक्षणांमध्ये अनावधानाने वजन कमी होणे, पुरेशी विश्रांती घेतल्यानंतरही अत्यंत थकवा जाणवणे, दीर्घकाळ ताप येणे, असामान्य गाठी, सूज येणे, शरीराच्या विशिष्ट भागात तीव्र वेदना, आतड्यांच्या हालचालींमध्ये बदल, त्वचा नेहमीपेक्षा पिवळी किंवा गडद होणे, बद्धकोष्ठता, अतिसार, मलामध्ये रक्त येणे, नाक, तोंड किंवा जवळच्या भागातून अस्पष्ट रक्तस्राव, आवाजात कर्कशपणा, गिळण्यास त्रास होणे, दीर्घकालीन खोकला किंवा जळजळ यांचा समावेश असू शकतो,” असे डॉ. चंद्रा म्हणाले.(PHOTO: Freepik)
-
ही लक्षणे तुमच्या शरीरात काहीतरी चुकीचे आहे याबाबत सावध करणारी चिन्हे असू शकतात. “या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका आणि पुढील निदानासाठी ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. (PHOTO: Freepik)
-
सुरुवातीच्या टप्प्यात कोणताही कर्करोग आढळल्यास जीव वाचू शकतो. ही लक्षणे सौम्य स्वरूपात सुरू होऊ शकतात; परंतु कालांतराने ती तीव्र होऊ शकतात. कर्करोग तुमच्या शरीराच्या सामान्य कार्यात व्यत्यय आणतो आणि जळजळ निर्माण करतो,” (PHOTO: Freepik)
-
कोणत्याही स्पष्ट कारणाशिवाय तुमच्या वजनाच्या १० टक्क्यांपेक्षा जास्त वजन कमी होणे, असे डॉ. गोयल यांनी नमूद केले.(PHOTO: Freepik)
-
आतड्यांसंबंधी सवयींमध्ये बदल : सतत अतिसार, बद्धकोष्ठता किंवा सकाळी सकाळी मलाच्या स्वरूपात बदल, जे काही आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकतात.(PHOTO: Freepik)
-
काळे मल: बहुतेक लोक सकाळी उठल्याबरोबर शौचास जातात आणि हे लक्षण सकाळी दिसून येते. काळे मल हे पोटाच्या कर्करोगामुळे होते. जर वरीलपैकी काही लक्षणांसह हे लक्षण दिसून आले, तर डॉक्टरकडे जा.(PHOTO: Freepik)
-
गाठी किंवा सूज : स्तन किंवा शरीराच्या इतर भागांमध्ये असामान्य वाटणारी किंवा आकारात वाढणारी कोणतीही गाठ किंवा सूज.(PHOTO: Freepik)
सकाळी दिसतं पोटाच्या कॅन्सरचं “हे” मोठं लक्षण; अजिबात दुर्लक्ष न करता वेळेत जीव कसा वाचवाल? जाणून घ्या
या सुरुवातीच्या लक्षणांना ओळखणे आणि वेळेवर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. जर तुम्हाला कोणतीही सतत किंवा असामान्य लक्षणे जाणवत असतील, तर नेहमीच डॉक्टरांचा सल्ला घ्या, डॉ. गोयल म्हणाले.
Web Title: Stomach cancer symptoms and signs symptoms that can signal the presence of cancer much before diagnosis srk