-
भारतात चहा हा आता फक्त एक पेय राहिलेला नाही, तर तो जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनला आहे. सकाळची सुरुवात असो किंवा संध्याकाळचा थकवा दूर करायचा असो, चहाशिवाय दिवस अपूर्ण वाटतो. पण महत्त्वाची बाब म्हणजे चहा पिण्यालाही एक योग्य वेळ असते. (फोटो सौजन्य : Pexels)
-
तज्ज्ञांच्या मते, जर योग्य वेळेत चहा घेतला गेला, तर तो आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो. मात्र, चुकीच्या वेळी प्यायल्यास त्याचे शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतात. (फोटो सौजन्य : Pexels)
-
चहामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, जे शरीराला फ्री रॅडिकल्सपासून वाचवतात. त्यामुळे थकवा कमी होतो, मन रिलॅक्स होते आणि एकाग्रता वाढते. (फोटो सौजन्य : Pexels)
-
पण जर चहा रिकाम्या पोटी घेतला गेला, तर पचनसंस्था कमकुवत होऊ शकते. त्यामुळे अॅसिडिटी, गॅस व पोटदुखी यांसारख्या समस्या वाढण्याचा धोका अधिक असतो. (फोटो सौजन्य : Pexels)
-
तज्ज्ञ सांगतात की, चहा पिण्याचा खरा आनंद तेव्हाच मिळतो, जेव्हा तो योग्य वेळी प्यायला जातो. चुकीच्या वेळी घेतलेला चहा आरोग्यासाठी अपायकारक ठरू शकतो. (फोटो सौजन्य : Pexels)
-
सकाळी नाश्त्यानंतर ८ ते ९ या वेळेत चहा घेणे सर्वांत योग्य मानले जाते. त्या वेळेस घेतलेला चहा शरीराला ऊर्जा देतो आणि पचनावर कोणताही नकारात्मक परिणाम करत नाही. (फोटो सौजन्य : Pexels)
-
अनेकांना सकाळी उठल्याबरोबर लगेच चहा घेण्याची सवय असते; पण ही सवय धोकादायक ठरू शकते. कारण- त्या वेळेस पोटातील आम्लाचे प्रमाण जास्त असते आणि चहा घेतल्याने त्याचा त्रास वाढतो. (फोटो सौजन्य : Pexels)
-
सकाळी चहा घेण्याची सवय नसेल, तर संध्याकाळी ४ ते ५ या वेळेत घेतलेला चहा सर्वोत्तम ठरतो. त्या वेळेस घेतलेला कप शरीरातील थकवा कमी करतो आणि मूड ताजेतवाना करतो. (फोटो सौजन्य : Pexels)
-
मात्र, काही वेळा चहा घेणे टाळणे गरजेचे आहे. सकाळी रिकाम्या पोटी, जेवण झाल्यानंतर लगेच आणि रात्री झोपण्याच्या अगोदर चहा घेऊ नये. कारण- त्या वेळेस घेतलेला चहा ऍसिडिटी वाढवतो, झोपेवर परिणाम करतो आणि पोषक घटकांचे शोषण कमी करतो. (फोटो सौजन्य : Pexels)
चहा पिण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या कधी टाळावा चहाचा कप
When to Drink Tea : योग्य वेळी घेतलेला चहाचा कप मनाला प्रसन्नता देतो, शरीराला ऊर्जा देतो आणि पचनसंस्थेलाही साह्य करतो.
Web Title: Best time drink tea for health benefits and when to avoid tea cup during day svk 05