• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • छगन भुजबळ
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. diabetes what is 3 am sugar level why doctor recommends test at this time iehd import asc

Diabetes : पहाटे ३ वाजता साखरेचं प्रमाण किती असतं? डॉक्टर याच वेळी तपासणी करायला का सांगतात?

रात्रीच्या वेळी हायपोग्लायसेमिया किंवा सकाळी लवकर हायपरग्लायसेमिया नियंत्रित करण्यासाठी पहाटे ३ वाजता रक्तातील साखरेची पातळी तपासली जाते.

October 21, 2025 23:43 IST
Follow Us
  • diabetes
    1/7

    मधुमेह असलेल्या लोकांसाठी, रात्रीच्या वेळी रक्तातील साखरेचे चढउतार व्यवस्थापित करणं कठीण असू शकतं. रात्रीच्या वेळी हायपोग्लायसेमिया किंवा सकाळी लवकर हायपरग्लायसेमिया नियंत्रित करण्यासाठी पहाटे ३ वाजता रक्तातील साखरेची पातळी तपासली जाते. ते का महत्त्वाचं आहे आणि तुम्हाला याबद्दल काय माहित असलं पाहिजे ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. (PC – Unsplash)

  • 2/7

    पहाटे वाजता साखरेची पातळी तपासणं म्हणजे काय?
    पहाटे ३ वाजता साखरेची पातळी म्हणजे या वेळेला तुमच्या रक्तातील साखरेचं प्रमाण तपासणं, तुम्ही झोपेत असताना साखरेची पातळी कमी किंवा जास्त होतेय का ते पाहणं. (PC – Unsplash)

  • 3/7

    पहाटे ३ वाजताच्या असामान्य रीडिंग्सचे व्यवस्थापन कसे करावे?
    रात्री संतुलित आहार घ्या. रात्री उशिरा गोड पदार्थ व साखरेचं प्रमाण अधिक असलेले पदार्थ खाणं टाळा. इन्सुलिन डोस किंवा औषधं वेळेवर घ्या. (PC – Unsplash)

  • 4/7

    पहाटे ३ वाजता रक्तातील साखर जास्त असेल तर?
    पहाटे ३ वाजता रक्तातील साखर जास्त असेल आणि सकाळी देखील ती जास्तच राहिली तर ते कॉर्टिसोल आणि ग्रोथ हार्मोन्समुळे घडतं. (PC – Unsplash)

  • 5/7

    पहाटे ३ वाजता रक्तातील साखर कमी असेल तर?
    पहाटे ३ वाजता रक्तातील साखर ७० मिलीग्रॅम/डीसीएलपेक्षा कमी असेल, तर ते जास्त इन्सुलिन, रात्रीचे जेवण वगळणे किंवा संध्याकाळी जास्त व्यायाम यामुळे होणारे हायपोग्लायसेमिया दर्शवू शकते. (PC – Unsplash)

  • 6/7

    पहाटे ३ वाजता तपासणी का करावी?
    डॉक्टर रात्रीचे हायपोग्लायसेमिया किंवा पहाटेच्या घटनेची सुरुवातीची लक्षणे ओळखण्यासाठी पहाटे ३ वाजता चाचणी करण्याची शिफारस करतात. (PC – Unsplash)

  • 7/7

    डॉक्टरांना कधी भेटावं?
    सातत्याने पहाटे तीन वाजता रक्तातील साखरेचं प्रमाण कमी किंवा जास्त जाणवत असेल, सकाळी डोकेदुखी, थकवा किंवा अनियंत्रित मधुमेह निदर्शनास आल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या. (PC – Unsplash)

TOPICS
मधुमेहDiabetesहेल्थHealthहेल्थ टिप्सHealth Tips

Web Title: Diabetes what is 3 am sugar level why doctor recommends test at this time iehd import asc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.