-
Shardiya Navratri 2025: हिंदू धर्मात आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून ते नवमीपर्यंत शारदीय नवरात्र साजरी केली जाते.
-
उद्यापासून (सोमवार, २२ सप्टेंबर) शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात होत आहे.
-
उपवासाच्या काळात शरीर हायड्रेटेड ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. पाणी, नारळपाणी, ताक, लिंबू सरबत किंवा फळांचे रस नियमितपणे प्या.
-
एकाच वेळी जास्त खाण्याऐवजी, थोड्या थोड्या वेळाने उपवासाचे पदार्थ खा. यामुळे पोट भरलेले राहते आणि अशक्तपणा जाणवत नाही.
-
उपवासाचे पदार्थ बनवताना कमी तेलाचा वापर करा. तळलेल्या पदार्थांऐवजी भाजलेले किंवा उकडलेले पदार्थ खाणे अधिक चांगले.
-
उपवासाच्या काळात शरीराला ऊर्जा कमी मिळते, त्यामुळे पुरेशी झोप घेणे आणि आराम करणे आवश्यक आहे.
-
उपवासाच्या काळात अतिशय थकवणारे व्यायाम टाळा. त्याऐवजी हलका व्यायाम किंवा योग करू शकता.
-
जर तुम्हाला अशक्तपणा किंवा चक्कर येत असेल, तर लगेच काहीतरी खा. शरीराच्या गरजेकडे दुर्लक्ष करू नका.
नवरात्रीमध्ये नऊ दिवस उपवास करताय? कसा असावा आहार, अशी घ्या आरोग्याची काळजी
उपवासाच्या काळात शरीर हायड्रेटेड ठेवणे खूप महत्त्वाचे आहे.
Web Title: Shardiya navratri 2025 follow these important tips while fasting for nine days festival photos sdn