• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • डोनाल्ड ट्रम्प
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. these 6 healthy foods that seem healthy but can increase kidney stones risk svk

Kidney Health: आरोग्यादायी पण किडनीसाठी हानिकारक असणारे ‘हे’ ६ अन्नपदार्थ

पालक, नट्स, बीट आणि इतर ‘सुपरफूड्स’देखील मूत्रपिंडातील खडे वाढवू शकतात; जाणून घ्या कसे आणि किती प्रमाणात सेवन करावे

Updated: October 1, 2025 15:27 IST
Follow Us
  • 'healthy' foods that may aggravate kidney
    1/8

    किडनी स्टोन म्हणजे मूत्रपिंडांमध्ये खडे होणे, ज्यामुळे तीव्र वेदना होऊ शकतात आणि आरोग्याच्या इतर समस्या उद्भवू शकतात. सामान्यतः ‘हेल्दी’ समजले जाणारे काही अन्नपदार्थ मूत्रपिंडातील खड्यांचा धोका वाढवू शकतात, विशेषतः जर त्यात ऑक्सलेट्स, प्यूरीन किंवा कॅल्शियमचे प्रमाण जास्त असेल. (फोटो सौजन्य: फ्रीपिक)

  • 2/8

    पालक (Spinach)
    पालकामध्ये ऑक्सलेट्सचे प्रमाण जास्त असते, मूत्रपिंडात खडे असलेल्या व्यक्तींनी पालकाचे प्रमाण मर्यादित ठेवावे. (फोटो सौजन्य: पेक्सेल्स)

  • 3/8

    नट्स आणि नट बटर (Nuts and Nut Butters)
    बदाम, काजू, शेंगदाणे यांसारख्या नट्समध्ये ऑक्सलेट्सचे प्रमाण जास्त असते. अत्याधिक प्रमाणात सेवन केल्यास मूत्रपिंडात खडे होण्याचा धोका वाढतो. (फोटो सौजन्य: पेक्सेल्स)

  • 4/8

    बीट (Beet)
    बीटामध्ये ऑक्सलेट्सचे प्रमाण जास्त असते, जे कॅल्शियम वाढवते आणि त्यामुळे खडे तयार होऊ शकतात. (फोटो सौजन्य: पेक्सेल्स)

  • 5/8

    डार्क चॉकलेट (Dark Chocolate and cocoa)
    डार्क चॉकलेट आणि कोको पाऊडरमध्ये ऑक्सलेट्सचे प्रमाण जास्त असते, त्यात कॅल्शियमसुद्धा जास्त असते. त्याच्या अति सेवनाने मूत्रपिंडात खडे होऊ शकतात. (फोटो सौजन्य: पेक्सेल्स)

  • 6/8

    रताळे (Sweet potatoes)
    रताळ्यांमध्ये ऑक्सलेट्सचे प्रमाण जास्त असते. उकडून खाल्ल्यास त्याचे प्रमाण कमी होऊ शकते. (फोटो सौजन्य: पेक्सेल्स)

  • 7/8

    चहा (Tea)
    अमृतासमान असणाऱ्या चहामध्ये ऑक्सलेट्सचे प्रमाण जास्त असते. मूत्रपिंडाचे खडे असलेल्या व्यक्तींनी ग्रीन किंवा हर्बल चहा निवडावा. (फोटो सौजन्य: पेक्सेल्स)

  • 8/8

    सल्ला: या अन्नपदार्थांचे सेवन मर्यादित प्रमाणात करा. कॅल्शियमयुक्त अन्नपदार्थांसोबत सेवन केल्यास ऑक्सलेट्सचे शोषण कमी होऊ शकते. पुरेसे पाणी प्या आणि हायड्रेटेड राहा. (फोटो सौजन्य: पेक्सेल्स)

TOPICS
मनोरंजनEntertainmentहेल्थ टिप्सHealth Tips

Web Title: These 6 healthy foods that seem healthy but can increase kidney stones risk svk 05

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.