-
Diwali 2025: दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. दिवाळीच्या फराळांसाठी घराघरांमध्ये लगबग चालू आहे. (सर्व फोटो सौजन्य : Pexels)
-
दिवाळीचा फराळ करताना उच्च ओलेइक (High Oleic) प्रकारचे सूर्यफूल तेल किंवा करडई तेल तळण्यासाठी चांगले पर्याय आहेत.
-
शेंगदाणा तेल (Groundnut Oil) हे तेल तळण्यासाठी उत्तम मानले जाते, विशेषतः लाकडी घाण्यावर काढलेले तेल.
-
शेंगदाणा तेलाची चव सौम्य असल्याने फराळाच्या पदार्थांची चव बिघडत नाही.
-
तळण्यासाठी वापरलेले तेल पुन्हा वापरणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.
-
त्यामुळे शक्य असल्यास तेल एकाच वेळी वापरावे. तसेच, रिफाइंड तेलांऐवजी लाकडी घाण्यावर काढलेल्या तेलांना प्राधान्य देणे अधिक चांगले मानले जाते.
-
एका वेळी भरपूर तेल गरम करणे टाळा आणि ठराविक प्रमाणात पदार्थ तयार करा.
-
तेल गरम करताना योग्य अंदाज घ्या. तेल काळे होईपर्यंत किंवा त्यातून धूर येईपर्यंत किंवा त्याला उग्र वास येईपर्यंत गरम करू नका.
-
अनेक पारंपरिक पदार्थांसाठी (उदा. लाडू, शंकरपाळी, अनारसे) तूप वापरले जाते.
Diwali Faral 2025: दिवाळीचा फराळ करताना तळण्यासाठी नेमके कोणते तेल वापरावे?
तळण्यासाठी वापरलेले तेल पुन्हा वापरणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.
Web Title: Diwali 2025 health tips which oil should we use to make diwali faral at home frying recipes sdn