-

साखरेचे सेवन थांबवल्याने तुमचे आरोग्य आश्चर्यकारक प्रकारे बदलू शकते. साखर बंद केल्याने लक्ष केंद्रित करण्यापासून ते हृदयाचं आरोग्य सुधारण्यापर्यंत अनेक फायदे मिळतात. चला तर मग जाणून घेऊयात की या गोड विषाचं सेवन बंद केल्यानंतर काय फरक पडेल.
-
साखरं खाणं बंद केल्यास वजन कमी करण्यास मदत होते.
-
साखर बंद करण्याऐवजी किमान जेवणातील साखरेचं प्रमाण कमी करूनही काही दिवसांत किंवा आठवड्यात फायदे मिळू शकतात, तुमचा मूड सुधारू शकतो, त्वचा नितळ होऊ शकते, लक्ष केंद्रित करण्याची क्षमता सुधारू शकते, व्यायामातील कार्यक्षमता वाढू शकते.
-
हृदयाचं संरक्षण
साखरेच्या अतिसेवनाचा हृदयास मोठा धोका आहे. साखरेचं प्रमाण कमी केल्यास किंवा साखर खाणं बंद केल्यास हृदयाचं आरोग्य सुधारू शकतं. रक्तदाब व फॅटी लिव्हरचा धोका कमी होतो. -
साखर बंद केल्यानंतर १० दिवसांच्या आत मुलांमध्ये मेटाबॉलिक सिंड्रोमची लक्षणं उलटी होऊ शकतात, ज्यामुळे कोलेस्टेरॉल, रक्तदाब आणि इन्सुलिन संवेदनशीलता सुधारते.
-
चव सुधारते
साखरेचं सेवन बंद केल्यास फळं व काजू यांसारखे पदार्थ अचानक गोड व समाधानकारक लागतात. तिखट पदार्थ कमी तिखट लागतात. -
वजन कमी करण्यास आणि रक्तातील साखर कमी करण्यास मदत होते
अतिरिक्त साखर कमी केल्याने रक्तातील ग्लुकोज स्थिर होण्यास मदत होते, इन्सुलिन संवेदनशीलता सुधारते आणि पोषक तत्वांनी समृद्ध आहारासोबत वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.
काही दिवस साखरेचं सेवन बंद केल्यास शरीरात काय बदल होतात?
साखर बंद करण्याऐवजी किमान जेवणातील साखरेचं प्रमाण कमी करूनही काही दिवसांत किंवा आठवड्यात फायदे मिळू शकतात
Web Title: What happens to body when you stop eating sugar iehd import asc