• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • रविंद्र धंगेकर
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ-बिहार निवडणूक
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. best home remedies for teeth whitening or teeth whitening tips asp

‘या’ ३ गोष्टी दातांवरील पिवळा थर करतील मिनिटांत दूर; फायदे काय, कसा करायचा वापर; जाणून घ्या तज्ज्ञांकडून

How to Get Rid of Yellow Teeth : आयुर्वेदात अनेक पदार्थांचा उल्लेख आहे; जे दात चमकदार ठेवण्यास, हिरड्या मजबूत करण्यास मदत करतात.

October 28, 2025 19:53 IST
Follow Us
  • Remedies-For-Yellow-Teeth_d1cd02
    1/8

    तोंडाच्या आरोग्याची स्थिती अलिकडेच चिंतेचा विषय ठरते आहे. लहान वयातच दात किडणे, दात पिवळे होणे, कमकुवत हिरड्या, तोंडाची दुर्गंधी आणि दातांमध्ये पायोरिया आदी समस्या वाढत आहेत. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 2/8

    या समस्या केवळ तोंडापुरत्या मर्यादित राहत नाहीत. तर हळूहळू तुमच्या दिसण्यावर, एकूण आरोग्यावरही परिणाम करतात. अस्वस्थ जीवनशैली, खाण्याच्या चुकीच्या सवयी, तोंडाची अस्वच्छता यामुळे दात पिवळे होतात आणि या समस्येचे मुख्य कारण चहा, कॉफी, तंबाखू किंवा थंड पेयांचे जास्त सेवन हेच आहे.(फोटो सौजन्य: @Freepik)

  • 3/8

    तर या समस्येवर उपाय म्हणून बरेच लोक विविध रासायनिक टूथपेस्ट, माउथ फ्रेशनर्स वापरतात. सुरुवातीला या वस्तू फायदेशीर वाटत असतील तरी, कालांतराने दात आणि हिरड्या कमकुवत होऊ लागतात. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 4/8

    अशा परिस्थितीत, नैसर्गिक उपाय सर्वात सुरक्षित आणि प्रभावी ठरतात. आयुर्वेदात अनेक पदार्थांचा उल्लेख आहे; जे दात चमकदार ठेवण्यास, हिरड्या मजबूत करण्यास मदत करतात. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 5/8

    आरोग्य तज्ज्ञ सुभाष गोयल स्पष्ट करतात की, त्रिफळा, हळद आणि मोहरीचे तेल हे तोंडाच्या आरोग्यासाठी महत्वाच्या ठरतात.(फोटो सौजन्य: @Freepik)

  • 6/8

    त्रिफळा चुर्ण – त्रिफळा चुर्ण हा एक प्राचीन आणि विश्वासू आयुर्वेदिक उपाय आहे. त्यात भरपूर अँटीऑक्सिडंट्स आहेत; जे दातांवरील दातांवरील टार्टर आणि प्लेक काढून टाकण्यास मदत करतात. यामुळे तोंडातील बॅक्टेरिया नष्ट होतात, तोंडाची दुर्गंधी कमी होते, नियमित सेवनाने दात नैसर्गिकरित्या पांढरे होतात, हिरड्या मजबूत होतात, पायोरियासारख्या समस्या कमी होतात. त्यामुळे त्रिफळा चुर्ण केवळ तोंडाच्या आरोग्यासाठीच नाही तर संपूर्ण पचनसंस्थेसाठी देखील फायदेशीर आहे.(फोटो सौजन्य: @Freepik)

  • 7/8

    हळद – भारतीय स्वयंपाकघरात सहज आढळणारी हळद दातांसाठी वरदान आहे. हळदीतील करक्यूमिन घटक बॅक्टेरियाची वाढ रोखतात, जळजळ कमी करतात, हिरड्यांमधील सूज, रक्तस्त्राव किंवा वेदना कमी करण्यास मदत, नियमित वापरामुळे दातांवरील पिवळा थर निघून जातो, नैसर्गिक चमक परत येते. त्याचबरोबर पायरिया आणि हिरड्यांच्या इतर समस्यांवर उपचार करण्यासाठी हळद फायदेशीर ठरते; यामुळे तोंड स्वच्छ ठेवते आणि आरोग्य सुधारते.(फोटो सौजन्य: @Freepik)

  • 8/8

    मोहरीच्या तेलाचे फायदे – मोहरीचे तेल केवळ स्वयंपाकातच नाही तर दात आणि हिरड्यांच्या आरोग्यासाठी देखील उपयुक्त आहे. त्याचे अँटीमायक्रोबियल गुणधर्म दातांचे जंतूंपासून संरक्षण करतात. त्याचप्रमाणे मोहरीच्या तेलाने हिरड्यांना मालिश केल्याने रक्ताभिसरण सुधारते, दात मजबूत होतात. हळद आणि त्रिफळा बरोबर मोहरीचे तेल मिक्स करून वापरल्यास दात स्वच्छ आणि पांढरे होण्यास मदत करते. (फोटो सौजन्य: @Freepik)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle Newsहेल्दी लाइफस्टाइलHealthy Lifestyle

Web Title: Best home remedies for teeth whitening or teeth whitening tips asp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.