-  

जीवनाचा आधार पाणी पाणी हे जीवनाचे मूळ आहे. आपल्या शरीरातील सुमारे ६० ते ७० टक्के भाग पाण्याचा बनलेला आहे. शरीरातील तापमान संतुलित ठेवणे, पचनक्रिया सुधारणे, सांध्यांचे स्निग्धपण आणि त्वचेचा तेज राखणे यात पाण्याची महत्त्वाची भूमिका आहे.
 -  
योग्य पद्धतीने पाणी साठवणे गरजेचे सद्गुरुंनी आपल्या ब्लॉगमध्ये सांगितले की, पारंपरिक पद्धतीनुसार पाणी धातूच्या भांड्यात विशेषतः तांबे, पितळ किंवा तांब्याच्या मिश्रधातूमध्ये साठवले पाहिजे.
 -  
तांब्याच्या भांड्याचे शुद्धीकरण ते म्हणतात की, रात्री तांब्याचे भांडे चिंच व हळद लावून धुवावे, त्यावर भस्म लावावे आणि पाणी भरून त्यावर फुल ठेवावे. दिवा लावून झोपल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी ते पाणी प्यावे.
 -  
मातीच्या भांड्यातील पाणी उन्हाळ्यात उपयोगी तज्ज्ञांच्या मते, उन्हाळ्यात मातीच्या भांड्यात साठवलेले पाणी शरीराच्या तापमानाला संतुलित ठेवते आणि पचनास मदत करते.
 -  
पाण्याशी कृतज्ञतेने वागा सद्गुरुंचे म्हणणे आहे की पाणी पिण्यापूर्वी क्षणभर त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. “हेच ते तत्त्व आहे, ज्याने तुमचे जीवन घडवले आहे,” असे ते सांगतात.
 -  
हाताने पाणी पिण्याचा सल्ला त्यांच्या मते, शक्य असेल तेव्हा पाणी हाताने प्यावे. जर कोणीतरी तुम्हाला धातूच्या ग्लासात पाणी दिले तर दोन्ही हातांनी धरून प्या, हे आदर आणि एकाग्रतेचे लक्षण आहे.
 -  
योग्य तापमानाचे पाणी पिणे आवश्यक योगमार्गावर असणाऱ्यांसाठी सद्गुरु सांगतात की, शरीराच्या तापमानाच्या चार अंशांच्या आतले पाणी प्यावे, म्हणजे सुमारे ३३ ते ४१ अंश से. विद्यार्थ्यांनी आठ अंशांच्या फरकात आणि गृहस्थांनी बारा अंशांच्या फरकातले पाणी प्यावे.
 -  
पाणी “खाणे”सुद्धा तितकेच महत्त्वाचे फळे आणि भाज्या यात मोठ्या प्रमाणात पाणी असते फळांमध्ये सुमारे ९०% आणि भाज्यांमध्ये ७०%. सद्गुरु सांगतात की, आपल्या आहारात किमान ७०% पाणी असलेले पदार्थ असावेत, जे शरीर हायड्रेट ठेवतात आणि पचन सुधारतात.
 -  
(सर्व फोटो सौजन्य : फ्रीपिक)
 
पाणी खावे की प्यावे? सद्गुरुंनी सांगितले पाणी पिण्याचे ‘हे’ पाच नियम
पाणी तांब्याच्या भांड्यात साठवा, हाताने प्या आणि पाण्याबद्दल कृतज्ञतेने वागा; सद्गुरुंचे आरोग्यदायी मार्गदर्शन
Web Title: Sadhguru water drinking rules health benefits of copper and clay vessels proper hydration svk 05