-

पुरेसे पाणी पित आहात का? हे संकेत ओळखणे महत्त्वाचे
दिवसभर हायड्रेशन राखण्यासाठी शरीराचे संकेत ओळखणे अत्यंत आवश्यक आहे. योग्य वेळी पाणी पिणे, गरजेनुसार प्रमाण वाढवणे आणि दैनंदिन सवयींमध्ये छोटे बदल केल्यास पाण्याची कमतरता होण्याचा धोका कमी होतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश) -
लघवीच्या रंगावरून कळते ‘हायड्रेशन’ ठीक आहे का?
तज्ज्ञांच्या मते, शरीरात पुरेसं पाणी आहे की नाही हे लघवीचा रंग स्पष्टपणे सांगतो. लघवीचा रंग जर स्वच्छ किंवा फिकट पिवळा असेल, तर तुम्ही योग्य प्रमाणात पाणी पिता आहात. मात्र, गडद पिवळी किंवा गडद रंगाची लघवी दिसत असेल तर लगेच पाणी वाढवण्याची गरज असते. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश) -
तहान लागतेय का?
शरीराला पाण्याची गरज भासली की सर्वात आधी तहान लागते. तुम्हाला फार कमी वेळा तहान लागत असेल तर याचा अर्थ शरीराला पुरेशी द्रव्ये मिळत आहेत. तज्ज्ञ सांगतात की, तहान हा शरीराचा सर्वात नैसर्गिक आणि विश्वासार्ह ‘हायड्रेशन’ सिग्नल आहे. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश) -
फक्त पाणीच नाही, इतर पेय-खाद्य पदार्थही देतात पाण्याचे फायदे;
पाणी पिणे महत्त्वाचेच, पण द्रव सेवनात फक्त पाणीच नव्हे तर इतर पेये आणि अन्नातील पाण्याचे प्रमाणही धरले जाते. फळे, भाज्या, सूपसारख्या पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी असते आणि हेही शरीराला हायड्रेट ठेवण्यात मदत करतात. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश) -
हवामान आणि शारीरिक मेहनतीनुसार पाण्याचे प्रमाण बदलते
गरम हवामान, उन्हात काम किंवा व्यायाम करताना शरीराला अधिक पाण्याची गरज लागते, त्यामुळे अशा परिस्थितीत “दररोज ८ ग्लास” या ठराविक ध्येयावर न राहता, परिस्थितीनुसार पाणी पिणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञ सांगतात. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश) -
जास्त पाणीही ठरू शकते धोकादायक
पाणी कमी पिणे जसे हानिकारक, तसेच खूप जास्त पाणी अल्पकाळात पिणेही धोक्याचे ठरू शकते, त्यामुळे रक्तातील सोडियमचे प्रमाण कमी होऊन ‘हायपोनेट्रेमिया’ नावाची दुर्मीळ पण गंभीर स्थिती निर्माण होऊ शकते, असा इशारा तज्ज्ञ देतात. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश) -
दिवसभर थोडं-थोडं पाणी प्या,
साध्या टिप्स ठेवा लक्षात पाणी एकदम न पिता, दिवसभर थोड्या-थोड्या प्रमाणात पिणे अधिक फायदेशीर असते. सकाळी उठल्यानंतर, जेवणापूर्वी अशा ठराविक वेळांशी पाणी प्यायल्यास सवय पक्की होते. तसेच लघवीचा रंग आणि तहान ही दोन्ही लक्षणे पाण्याचे योग्य प्रमाण ठरवायला मदत करतात. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश) -
(टीप: येथे देण्यात आलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या…) (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश)
लघवीचा रंग देतो खरा इशारा! पाणी पुरेसं पिताय का ‘हे’ सांगणारे ७ स्पष्ट संकेत
लघवीचा रंग, तहान, हवामान, आहार आणि पाण्याचं प्रमाण… हायड्रेशन योग्य आहे की नाही, हे सोप्या संकेतांवरून ओळखा
Web Title: Are you drinking enough water 7 signs to check your hydration level easily and stay healthy daily svk 05