• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता सविस्तर
  • लोकसत्ता प्रीमियम
  • Subscribe at Rs 699
  • नरेंद्र मोदी
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. which fruit is better for breakfast detailed comparison of guava and banana benefits svk

पेरू की केळी? नाश्त्यासाठी कोणते फळ अधिक फायदेशीर?

दोन्ही फळांचे पोषकतत्व, संशोधनातील निष्कर्ष आणि आयुर्वेदिक दृष्टिकोन जाणून घ्या; आपल्या दीनचर्येनुसार कोणते फळ आहे उत्तम?

November 18, 2025 15:28 IST
Follow Us
  • Guava and banana comparison for breakfast.
    1/9

    संतुलित आहारात फळांचा नेहमीच मोठा वाटा राहिला आहे. आयुर्वेदापासून आधुनिक वैद्यकशास्त्रापर्यंत फळांचे आरोग्यावरचे उपयोग सिद्ध झाले आहेत. नाश्त्यात फळे घेतल्याने दिवसभर ऊर्जा टिकून राहते. स्मूदी, शेक, सॅलेड किंवा डेझर्ट — फळांचे अनेक प्रकारे सेवन करता येते. सामान्य फळांमध्ये सफरचंद, पपई, केळी, पेरू, डाळिंब आणि संत्री यांचा समावेश होतो. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)

  • 2/9

    पेरूचे पोषक घटक
    १०० ग्रॅम पेरूमध्ये सुमारे ६८ कॅलरीज, ५.४ ग्रॅम फायबर, २२८ मिग्रॅ व्हिटॅमिन C, ०.९ ग्रॅम हेल्दी फॅट्स, २.६ ग्रॅम प्रोटीन आणि ४१७ मिग्रॅ पोटॅशियम असते. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)

  • 3/9

    पेरूचे आरोग्यदायी फायदे
    पेरू हा व्हिटॅमिन C चा उत्तम स्रोत असल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढवतो. अँटीऑक्सिडंट्समुळे सूज आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी होतो. कमी कॅलरीज आणि जास्त फायबरमुळे वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते. तसेच LDL कोलेस्ट्रॉल कमी करण्यात आणि रक्तदाब संतुलित ठेवण्यात मदत करू शकतो. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)

  • 4/9

    केळीचे पोषक घटक
    USDA नुसार १०० ग्रॅम पिकलेल्या केळ्यामध्ये ८९ कॅलरीज, ०.३३ ग्रॅम फॅट, ० मिग्रॅ कोलेस्ट्रॉल, १ मिग्रॅ सोडियम, २२.८ ग्रॅम कार्बोहायड्रेट, २.६ ग्रॅम फायबर, १.०९ ग्रॅम प्रोटीन आणि ३५८ मिग्रॅ पोटॅशियम असते. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)

  • 5/9

    केळीचे आरोग्यदायी फायदे
    केळी हा पोटॅशियमचा उत्तम स्रोत असून हृदयाचे आरोग्य व रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतो. नैसर्गिक साखर व कार्ब्समुळे त्वरित उर्जा मिळते, त्यामुळे नाश्ता किंवा प्री-वर्कआउटसाठी उत्तम मानले जाते. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)

  • 6/9

    केळ्याबद्दलचे संशोधन काय सांगते?
    ‘Antioxidant and anti-atherosclerotic potential of Banana’ या अभ्यासानुसार केळीमध्ये कार्ब्स, फायबर, प्रोटीन, ओमेगा फॅटी अॅसिड्स, पोटॅशियम, कॅरोटिनॉइड्स, व्हिटॅमिन C-E आणि अनेक पॉलिफेनॉल्स आढळतात. हे घटक अँटीऑक्सिडंट व हृदयसंरक्षक म्हणून कार्य करतात. केळी व त्याचे पदार्थ आहारात घेतल्यास हृदयविकाराचा धोका कमी होण्यास मदत होते. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)

  • 7/9

    पेरूबद्दलचे संशोधन काय सांगते?
    ‘Guava (Psidium guajava): Therapeutic and health potential’ या अभ्यासानुसार पेरूला अँटी-इन्फ्लेमेटरी, अँटी-हायपरटेन्सिव्ह, अँटी-ओबेसिटी, अँटीऑक्सिडंट, अँटीडायरियल आणि अँटीडायबेटिक गुणधर्म आहेत. पेरू दंत आरोग्यास मदत करतो आणि हिमोग्लोबिन वाढवण्यासही उपयुक्त ठरतो. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)

  • 8/9

    आयुर्वेद काय सांगतो?
    आयुर्वेदनुसार पेरू पित्त आणि कफ संतुलित ठेवतो, त्यामुळे अॅसिडिटी किंवा मंद पचन असलेल्या लोकांसाठी फायदेशीर. तर केळी वात कमी करणारे पोषक असून रात्री खाणे टाळावे, कारण त्यामुळे कफ वाढून पचन धीमे होऊ शकते. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)

  • 9/9

    पेरू वि. केळी – नाश्त्यासाठी काय उत्तम?
    दोन्ही फळे उपयुक्त आहेत. पचन सुधारायचे असेल, वजन कमी करायचे असेल किंवा हलका, फायबरयुक्त नाश्ता हवा असेल तर पेरू उत्तम. जलद ऊर्जा, स्नायूंसाठी आधार आणि पटकन पचणारा नाश्ता हवा असेल तर केळी चांगला पर्याय. दिनचर्येनुसार निवड बदलू शकते. सकाळी पेरू योग्य, तर धावपळीच्या किंवा वर्कआउटच्या दिवशी केळी अधिक फायदेशीर. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleहेल्थ टिप्सHealth Tips

Web Title: Which fruit is better for breakfast detailed comparison of guava and banana benefits svk 05

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.